प्रतिष्ठा न्यूज

मोहन माने यांचे झंझावात नाटक व अब्दुल सय्यद यांचा आयुष्याच्या वाटेवर कविता संग्रहाचे प्रकाशन

प्रतिष्ठा न्यूज
तासगाव प्रतिनिधी : जेष्ठ साहित्यिक मोहन माने यांचे झंझावात नाटक व अब्दुल सय्यद यांचा आयुष्याच्या वाटेवर कविता संग्रह या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक मुबारक उमराणी यांच्या हस्ते झाले.
श्री ज्ञानदा साहित्य, कला व सांस्कृतिक मंडळ सावर्डे व ग्रामपंचायत सावर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने सावर्डे ग्रामपंचायत येथे हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या मुख्य अध्यक्षपदी सरपंच सौ. उल्काताई माळी होत्या.
यावेळी माजी सरपंच मारुती दादा, माजी आदर्श सरपंच प्रदीपकाका पाटील, उपरपंच संजयकाका माने पाटील, हरिभाऊ गुरव, बाळासाहेब शेटे, पांडुरंग लांडगे, प्रकाश भोसले, प्रकाशक तानाजीराजे जाधव व सौ. विद्या जाधव, राजाराम माने, प्रा. भास्कर कदम, राम गुरूजी, जेष्ठ साहित्यिक शिवाजीराव देशमुख यांच्या सह साहित्यिक व नागरिक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.