प्रतिष्ठा न्यूज

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती भ्रष्टाचार प्रकरण डीडीआर कडून चालढकल.. ठेकेदार व आर्किटेक यांच्याकडून टाइमपास : अमोल काळे

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या विस्तारीत बेदाणा मार्केट मधील बांधकामाची दुबार तपासणी झाली आहे.तर बिलाच्या फेर तपासणी साठी ठेकेदार व आर्किटेक यांच्याकडून टाईमपास सुरू असून डी डी आर अनिल पैलवान यांच्याकडूनही कामात दिरंगाई सुरू आहे असा आरोप मनसे नेते अमोल काळे यांनी केला असून यावर येत्या आठ दिवसात काही निर्णय न झाल्यास मनसे स्टाईलने दणका देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.दिलेल्या निवेदनात त्यांनी सांगितले की अशोक भिलवडे, कन्स्लंटींग इंजिनियर सांगली यांनी तासगांव कृषि उत्पन्न बाजार समितीचे विस्तारीत बेदाणा मार्केट मधील बांधकामाची तपासणी करुन अहवाल बाजार समितीकडे सादर केलेला होता.तथापि त्यांनी केलेला तपासणी अहवाल मान्य नसलेचे कारणाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून तपासणी करुन घ्यावी अशी कुबेरा कन्स्ट्रक्शन प्रा.लि. सांगली यांनी मागणी केली होती.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग सांगली यांनी सदर तपासणी करणेस लेखी पत्राव्दारे असमर्थता दर्शविली आहे.बाजार समितीने विजयकुमार गणपतराव पाटील प्रो.पा.गणपती कन्स्लटन्सी सांगली यांचेकडून दुबार तपासणी करुन घ्यावी.कुबेरा कन्स्ट्रक्शन प्रा.लि.सांगली व चौगुले पाटील कन्सलटंट प्रा.लि.यांना वारंवार कळवूनही ते बांधकाम तपासणीसाठी उपस्थित राहात न्हवते.तासगाव बाजार समितीने सदर बांधकामाची दुबार तपासणी  करुन घेतली.मात्र बिलाच्या तपासणीसाठी जीएसटी डिपार्टमेंटच्या रेड मध्ये आमची काही कागदपत्रे व संगणकातील माहिती अधिकारी जाताना सोबत घेऊन गेले आहेत व चौकशी झाल्यानंतर ती आमच्या ताब्यात देतील.त्यानंतर आम्हाला आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागू शकतो यासाठी आम्हाला 23: 12: 2023 पर्यंत वाढीव कालावधी मिळावा अशी विनंती सभापती यांच्याकडे केली होती.ही तारीख ही संपल्याने ठेकेदार व आर्किटेक हे जाणीवपूर्वक टाईमपास करत यात वेळ काढूनपणा करत आहेत.तर विशेष लेखापरीक्षक अनिल पैलवान हे कामात दिरंगाई करत असल्याचा आरोप मनसे नेते अमोल काळे यांनी केला आहे.
चौकट:
मनसे स्टाईलचा दणका देणार काळे…तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भ्रष्टाचारावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गेली दोन वर्षे सातत्याने पाठपुरावा करून या भ्रष्टाचाराचा भांडाफोड आम्ही करत आहोत.मात्र ठेकेदार व अधिकारी दुय्यम निबंधक,जिल्हा उपनिबंधक व बाजार समितीचे सचिव यांना हाताशी धरून कागदी घोडे नाचवत आहेत.या प्रकरणात प्रशासनाने काही हालचाली न केल्यास त्यांना लवकरच दणका देणार आहे असे अमोल काळे यांनी सांगितले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.