प्रतिष्ठा न्यूज

अतिक्रमण विभागाकडून सांगलीतील बेकायदेशीर होर्डिंग हटविण्याची कारवाई सुरू; आयुक्त शुभम गुप्ता यांची कारवाई

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली महापालिकेकडून अनधिकृत हॉल्डिग हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशाने अतिक्रमण विभागाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. बुधवारी कोल्हापूर रोडवरील 20 बाय 40 मापाचा होल्डिंग सांगाडा उपआयुक्त वैभव साबळे यांच्या सूचनेनुसार सहायक आयुक्त सहदेव कावडे आणि अतिक्रमण पथक प्रमुख दिलीप घोरपडे यांच्या पथकाने हटविला केला.
मुंबईतील होल्डींग दुर्घटनेनंतर महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी मनपा क्षेत्रातील अनधिकृत होल्डींगचा सर्व्हे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. यानुसार उपआयुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा क्षेत्रातील अनधिकृत होल्डिंगचा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये मनपक्षेत्रात एकूण 31 होल्डिंग अनधिकृत असल्याचे समोर आले. त्यानंतर आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशाने आजपासून अनधिकृत होल्डिग हटवण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये आज प्रभाग समिती 1 अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर रोडवरील 20 बाय 40 मापाचा मोठ्या होल्डिंगचा सांगाडा सहायक आयुक्त सहदेव कावडे आणि अतिक्रमण पथक प्रमुख दिलीप घोरपडे यांच्या पथकाने क्रेंनच्या साहाय्याने निष्कासित करण्यात आला.
यापुढेही अनधिकृत होल्डिंग हटविण्याची कारवाई सुरूच राहणार असून संबधित होल्डिंग मालकांकडून दंडही वसूल करण्यात येणार आहे असा इशारा उपआयुक्त वैभव साबळे यानी दिला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.