प्रतिष्ठा न्यूज

प्रा. संतोष देवराये लिखित “आरक्षण लढा आणि मराठ्यांचा लॉंग मार्च” या पुस्तकाचे आज सायंकाळी प्रकाशन

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : – महाराष्ट्रातील प्रख्यात वक्ते, लेखक, शिवशंभू चरित्राचे गाढे अभ्यासक, मराठा सेवा संघाचे प्रदेश प्रशिक्षक- प्रा.संतोष देवराये यांनी मराठा आरक्षण संघर्ष लढ्यावर लिहिलेल्या “आरक्षण लढा आणि मराठ्यांचा लाँग मार्च” या पुस्तकाचे प्रकाशन, सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत दि.29 मार्च रोजी संपन्न होत आहे.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी- मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष- शिवश्री कामाजीराव पवार हे राहणार आहेत, तर मराठा आरक्षणाचे संघर्ष यात्री- शिवश्री दत्ता पाटील हाडसनिकर यांचे शिवहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
प्रा.संतोष देवराये यांनी अनेक वैचारिक, ऐतिहासिक अशी पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या सर्व पुस्तकांना समाज बांधवांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.सामाजिक चळवळीवर आणि मराठा आरक्षण संघर्ष लढ्यावर लिहिण्यात आलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास आपण उपस्थित राहून, मराठा आरक्षण संघर्ष लढ्याच्या प्रबोधन कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हासचिव- शिवश्री रमेश पवार, शिवश्री सतिष जाधव, जिल्हाकोषाध्यक्ष- शिवश्री पि.के.कदम शिवश्री प्रल्हाद दुरपडे, जिल्हाकार्यध्यक्ष- शिवश्री संजय लोंढे, शिवश्री बळीराम फाजगे, शिवश्री राधाकृष्ण होगे, शिवश्री बाजीराव वडवळे, शिवश्री
नानाराव कल्याणकर, अध्यक्ष मराठा सेवा संघ नांदेड (ऊ ) उद्धवराव सूर्यवंशी अध्यक्ष, मराठा सेवा संघ नांदेड (द)  सर्व पदाधिकारी मराठा सेवा संघ व सर्व कक्ष नांदेड
दि.29 मार्च 2024 रोज शुक्रवार, वेळ :- संध्याकाळी- 6:00 वाजता, स्थळ :- यशवंतराव चव्हाण मराठा मुलांचे वसतिगृह नवा मोंढा नांदेड.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.