प्रतिष्ठा न्यूज

खाडे पब्लिक स्कूल मालगाव चे अंतरशालेय स्पर्धेतील यश

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
मिरज : दास बहु उद्देशीय विश्वस्त संस्था संचलित मातोश्री तानुबाई दगडु खाडे पब्लिक स्कूल मालगाव येथील विद्यार्थ्यांनी विवीध आंतरशालेय स्पर्धेत उत्साहाने भाग घेवून उत्कृष्ठ कामगिरी केली. या आंतरशालेय स्पर्धेमध्ये रोल बॉल या खेळ प्रकारात शाळेने तिसरा क्रमांक पटकावत इयत्ता ८ वी मध्ये शिकत असणाऱ्या श्लोक पाटील या विद्यार्थ्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर सॉफ्ट बॉल या खेळ प्रकारात उत्कृष्ठ कामगिरी बद्दल गोविंद खोत व मलिकरेहान जमादार यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना संचालक सुमन खाडे, सुशांत खाडे, कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे, मुख्याध्यापिका सुप्रिया पाटील, समन्वयक ज्योत्स्ना माने,  क्रिडा शिक्षक आदिनाथ गायकवाड व इतर शिक्षवृंद यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.