प्रतिष्ठा न्यूज

गावगाडा फाउंडेशन बावेलीचा सामाजिक, स्तुत्य उपक्रम

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून कडवे ( ता. गगनबावडा) येथे गावगाड्यांच्या वतीने ग्रामस्वच्छता करण्यात आली.यावेळी गावगाडा फाउंडेशनने परिसर अतिशय स्वच्छ व सुंदर बनवून लोकांना मार्गदर्शन केलं. आपलं घर व परिसर स्वच्छ ठेवा, तुमच्या मुलांना शिक्षण द्या, आई-वडिलांची सेवा करा, माणुसकीचा धर्म जोपासा, गोरगरिबांना मदत करा, समाजात प्रेमाने वागा ,कोणाचाही द्वेष करू नका या विषयावर गावगाड्याने मार्गदर्शन केलं.
गावगाड्या फौंडेशन ची स्थापना दोन वर्षांपूर्वी झाली. त्यावेळी पासून आज पर्यंत प्रत्येक काम हे सामाजिक भावनेतूनच करण्यात आलं आहे.गावाचा शिवकालीन इतिहास उजेडात आणला, पर्यटन स्थळ उजेडात आणले. बावेली येथील आठवडी बाजाराला पुनर्जीवित केलं, वृक्षारोपण केलं, पूरग्रस्तांना मदत केली, भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना मदत केली, शालेय मुलांसाठी स्पर्धा परीक्षा चाचणी घेऊन पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी या तालुक्यातील विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन प्रोत्साहित केलं.शालेय मुलांवर संस्काराचे कार्यक्रम घेतले, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला, महिलांसाठी हळदी- कुंकू कार्यक्रम घेतला, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती भव्य सभा मंडप घालून केली. स्वच्छ अंगण, सुंदर रांगोळी स्पर्धा घेतली, गाव स्वच्छ सुंदर बनवल, गावातील प्रत्येक घरात झाडू वाटप केले. रेशन विषयी जनजागृती केली, शाळेला भेट देऊन शिक्षण पद्धतीवर लक्ष ठेवले, आरोग्य विषयी जनजागृती केली. असे हे समाजकार्य नेहमी चालू असत.
संत गाडगेबाबांचे कार्य पुढे नेण्याची गरज आहे. याच उद्देशाने गावगाडा फाउंडेशन कार्य करत असतो. परिसर व माणसाची मनपरिवर्तन करणे हीच आजची गरज आहे.
ग्रा. पं .कडवे येथे ग्रामस्वच्छतेवेळी उपस्थितीत ग्रामपंचायत च्या लोकनियुक्त सरपंच सौ. रेश्मा परीट, बावेली गावचे लोकनियुक्त सरपंच व गावगाड्यांचे अध्यक्ष युवराज कदम, गावचे मार्गदर्शक, सल्लागार राहुल कांबळे, ग्रामपंचायत बावेलीचे सदस्य व गावगाडा फाउंडेशन सदस्य आनंद कांबळे, उपाध्यक्ष संजय म्हस्कर, सचिव सुनील गुरव विजय पाटील, सुदर्शन म्हस्कर, रुपेश म्हस्कर, विशाल म्हस्कर गावगाडा फाउंडेशन मेंबर व ग्रामपंचायत बावेली सदस्य दीपक म्हस्कर, कडवे गावचे सामाजिक कार्यकर्ते सुभाष कांबळे उपस्थितीत होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.