प्रतिष्ठा न्यूज

‘हिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी म्हैसाळ (जिल्हा सांगली) येथे 22 जानेवारीला हिंदु राष्ट्र-जागृती सभा ! – संतोष देसाई, हिंदु जनजागृती समिती

प्रतिष्ठा न्यूज
मिरज (जिल्हा सांगली) : भारताच्या संविधानात प्रस्तावनेत प्रत्येक नागरिकाला समता, बंधुता आणि न्याय मिळेल, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात आपल्या देशात अल्पसंख्य आयोग, सच्चर आयोग, अल्पसंख्यांक विकास मंत्रालय आहे; मात्र बहुसंख्य हिंदूंना कोणतेही संरक्षण देणारे मंत्रालय-आयोग नाही. देशभरात केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण, तर मशिदी-चर्चचे सरकारीकरण का नाही ? अल्पसंख्याकांना धर्माच्या आधारावर शैक्षणिक अनुदान, मग बहुसंख्य हिंदूंनी काय अपराध केला आहे ? हे सर्व पहाता भारतात खरोखरच ‘सेक्युलर’ व्यवस्था अस्तित्वात आहे का ? हिंदूंच्या हजारो युवतींना उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद म्हणजे ‘लव्ह जिहाद’. भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे संकट ‘हलाल जिहाद’ यांसारख्या हिंदूंवर होणार्‍या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी 22 जानेवारी 2023 या दिवशी म्हैसाळ येथे कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सायंकाळी 5.30 वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई यांनी दिली. या प्रसंगी शिवसेनेचे (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख श्री. माधवराव गाडगीळ, हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिभा तावरे, श्री. गिरीष पुजारी उपस्थित होते. म्हैसाळ येथील सकल मराठा समाजाचे श्री. संभाजी शिंदे, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे श्री. मनोज जाधव, श्री. दिलीप (बंडू) पाटील, श्री. विनायक कोळी, श्री. विशाल पाटील, भाजपचे सांस्कृतिक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. ओंकार शुक्ल यांनी सभेसाठी पाठिंबा दर्शवला आहे.

श्री. संतोष देसाई पुढे म्हणाले, ‘‘या सभेत हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये आणि सनातन संस्थेच्या सौ. भक्ती डाफळे या मार्गदर्शन करणार आहेत. सभेच्या ठिकाणी क्रांतीकारकांविषयी माहिती देणारे फलक, हिंदूंना प्रतीदिन करावयाच्या धर्माचरणाच्या कृती, साधना यांविषयी मार्गदर्शन करणारे फलक प्रदर्शन, तसेच हिंदु जागृती करणार्‍या ग्रंथांचे अन् हिंदूंना धर्मशिक्षण देणार्‍या विविध ग्रंथांचे प्रदर्शनही लावण्यात येणार आहे. सभेसाठी मिरज तालुक्यातील गावांमध्ये प्रसार चालू असून विविध तरुण मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. कोपरा बैठका यांसमवेत भित्तीपत्रके, हस्तपत्रके, फलकलेखन, सामाजिक संकेतस्थळ यांच्या माध्यमातून व्यापक स्तरावर सभेचा प्रसार चालू आहे. तरी या सभेसाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.’’

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.