प्रतिष्ठा न्यूज

प्रदेश सचिव ज्योती आदाटे यांचा सन्मान

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या शिफारशीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडी वर प्रदेश सचिव म्हणून निवड करण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी ज्योती ताईंना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला आणि त्यांचे अभिनंदन केले.सर्व स्तरातुन त्यांचे कौतुक होत आहे.ज्योती ताई या सामाजिक राजकीय सांस्कृतिक या सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत.त्यांनी अगदी शालेय जीवनापासूनच समाजकरणात सुरवात केली आहे.गेल्या 35 वर्षांपासून ज्योती ताईंची सामाजिक कार्यकर्ती म्हणून सांगलीकरांना ओळख आहे.हि ओळख निर्माण करायला त्यांनी प्रचंड संघर्ष केला आहे अगदी प्रतिकूल परिस्थितीतून आपली वाट निर्माण केली आहे.गरीबीचं आणि बेघरं यांच काय जीवन असतय ते त्यांनी प्रत्यक्षात अनुभवलं आहे.परिस्थिला कुरवाळत न बसता समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अनेक वेळा जेलमध्ये गेलेल्या आहेत.अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले होते.प्रसंगी लाठीचार्ज झालेला आहे.चळवळीत काम करता करता कधी त्या राजकारणात गेल्या ते त्यांनाच कळले नाही. Fyba ला शिकत असतानाच अगदी लहान वयातच सांगली नगर परिषदेवर नगरसेविका म्हणून निवडून आल्या त्यानंतरच्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेवर दोन वेळा असे सलग तीन वेळा वेगवेगळ्या प्रभागात निवडुन येऊन हॅट्रीक नगरसेविका करण्याचा मान पटकावला.या दरम्यान त्यांनी त्यांच्या प्रभागात प्रचंड कामे उभी केली.त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून स्वतः साहेबांनी त्यांना संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षा म्हणून नेमणूक केली.त्यानंतर समितीत त्यांनी कामाचा धडाकाच लावला हजारो प्रस्ताव मंजुर केले. संपुर्ण जिल्हाभर प्रशिक्षण शिबीर मेळावे घेऊन वंचित लोकांना लाभ घेण्यासाठी प्रवृत्त केले.अगदी कोरोणाच्या काळात सुध्दा जिवाची पर्वा न करता लोकांना जागरूक करित फिरत राहील्या.वारांगणाच्या दारात समितीला नेऊन त्यांनी समाजासमोर एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.त्यामूळेच त्यांच्या कामाची दखल घेऊन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी त्यांना महिला आघाडीच्या प्रदेश सचिव पदावर निवड करून त्यांच्या कामाची पोचपावती दिली.फक्त राजकारण न करता वेगवेगळ्या पातळीवर त्यांचे कार्य चालू आहे त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्ष आहेत त्या व त्यांच्या टिमने अनेक भोंदूबाबांचा पर्दाफाश केला आहे. सर्वसामान्यांने आर्थिक मानसिक भावनिक आणि शारीरिक शोषण होऊ नये यासाठी चमत्काराचे प्रयोग प्रात्यक्षिकेसहित व्याख्याने देत असतात. आकार फौंडेशनच्या त्या ट्रश्टी देखिल आहेत ज्यामध्ये अनाथ व एकपालक असलेल्या मुलांना शिक्षणाचा स़पुर्ण खर्च केला जातो त्यांनी स्वतः एक मुलगी दत्तक घेतली आहे.सांस्कृतिक क्षेत्रात देखिल त्या आघाडीवर आहेत त्या नाट्य व चित्रपट अभिनेत्री आहेत अनेक नाटकांमधून आणि चित्रपटात वेगवेगळ्या भुमिका करुन आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे अगदी दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केले आहे.त्या अखिल भारतीय नाट्य व चित्रपट महामंडळावर आजीव सभासद आहेत.तसेच राजकारणाला त्यांनी कधीच आपला व्यवसाय केला नाही. आपला व आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी विमा प्रतिनिधी म्हणून गेल्या 27 वर्षांपासून कार्यरत आहेत सलग 23 वर्षे शतकवीर व द्विशतकवीर चा बहुमान पटकावला आहे.त्यांनी विमा व्यवसायात अमेरिकेचा जागतिक पुरस्कार प्राप्त केला आहे. त्याच्या सर्वच क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या ताईंना प्रदेश सचिव पदावर निवड करून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी सन्मानच केला आहे.
यावेळी ज्योती ताई च्या सोबत महिला आघाडीच्या सरचिटणीस प्रियांका तुपलोंडे आणि असंघटित महिला आघाडीच्या अध्यक्षा संगिता ताई जाधव उपस्थित होत्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.