प्रतिष्ठा न्यूज

नवभारत सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : शिक्षक व शिक्षकेतर सेवकांच्या अडीअडचणी तात्काळ सोडवून, आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हेच आमचे सर्वात मोठे ध्येय असल्याचे प्रतिपादन नवभारत शिक्षण मंडळ सेवकांची सहकारी सोसायटीचे चेअरमन विकास कुंभार यांनी व्यक्त केले.

येथील नवभारत शिक्षण मंडळ सेवकांची सहकारी सोसायटीची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शांतिनिकेतन लोकविद्यापीठातील हॉलमध्ये मोठ्या उत्साहात, खेळीमेळीत संपन्न झाली. यावेळी संस्थेचे उपसंचालक डी. एस. माने यांच्यासह सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सर्वसाधारण सभेचे प्रमुख पाहुणे, उपप्राचार्य सतीश होनराव यांनी सभासदांना मार्गदर्शन करत विविध सहकारी कायद्याविषयी माहिती दिली.

संस्थेचे सेक्रेटरी रमेश मगदूम यांनी विषय पत्रिकेचे वाचन व वार्षिक अहवाल सादर केला. सभासदांना तात्काळ सुलभ कर्ज वाटप, विनम्र सेवा देऊन, संस्थेचे संचालक गौतम पाटील, उपसंचालक बी.आर थोरात, डी. एस. माने यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटी सहकार क्षेत्रात मार्गक्रमण करत असल्याचे सांगितले.

सोसायटीच्या वतीने सभासदांच्या पाल्यांचा विविध क्षेत्रात उत्तम यश मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच सभासदांना भरघोस लाभांश व भेटवस्तू देण्यात आल्या.

यावेळी सोसायटीचे व्हा. चेअरमन संदीप म्हस्कर, संचालक सतीश पाटील, आनंदा परदेशी, रूपाली जाधव, राजकुमार निर्मळे, भारती देसाई, माया जाधव,धम्मपाल श्रावस्ती, सिद्धाप्पा घेरडे,दत्तात्रय खाडे यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.