प्रतिष्ठा न्यूज

नांदेड जिल्ह्यात शिक्षक सेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्याने सर्वत्र अभिनंदन

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
नांदेड : जिल्ह्यातील शिक्षक सेनेला चांगली बळकटी येण्याच्या उद्देशाने शिवसेना पक्ष प्रमुख यांच्या आदेशाने शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष यांच्या उपस्थितीत काही शिक्षकांची नांदेड शिक्षक सेनेच्या पदाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दि.25 एप्रिल 2023 रोजी आदर्श इंटरनॅशनल स्कुल पश्चिम गोरेगाव मुंबई येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशान्वये शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष मा.ज.मो.अभ्यंकर यांच्या हस्ते खालील शिक्षकांची शिक्षक सेनेचे पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यात 1) शिक्षकसेना राज्य उपाध्यक्ष पदी- विठ्ठल चव्हाण, 2) शिक्षक सेनेच्या समन्वयक पदी- अनिरुद्ध सिरसाळकर, 3) जिल्हा सहसमन्वयक पदी- बालाजीराव भांगे, 4) जिल्हा उपाध्यक्ष पदी- शेख मुस्तफा, 5) जिल्हा मार्गदर्शक पदी- बळीराम शिंदे, 6) लोहा तालुका अध्यक्ष पदी- संभाजी पवार यांच्या नियुक्त्या नियुक्ती पत्र देऊन करण्यात आल्या आहेत.
यावेळी शिक्षकसेना मुंबई विभागीय अध्यक्ष- मा. अजितजी चव्हाण, नांदेड जिल्हा परिषद शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष- संतोष अंबुलगेकर, जिल्हा सरचिटणीस- रविद्र बंडेवार यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी संपुर्ण नांदेड जिल्हा शिक्षक सेनामय करून आपल्या आदेशाप्रमाणे शिक्षक सेनेला चांगली बळकटी निर्माण करू तसेच शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी सदैव काम करत राहू असे आश्वासन दिले. या निवडी बद्दल माजी आमदार तथा शिवसेनेचे लातूर जिल्हा संपर्क प्रमुख मा. रोहिदास चव्हाण, नांदेड सहसंपर्क प्रमुख मा.भुजंग पाटील डक, नांदेड जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, माधव पावडे, संतोष आंबूलगेकर, तानाजी पवार, गंगाधर कदम, रविंद्र बंडेवार,सह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व शिक्षक सेनेच्या सदस्यांनी अभिनंदनकेले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.