प्रतिष्ठा न्यूज

कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पोलीस बांधवांना राख्या बांधून केला रक्षाबंधन सण साजरा

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : राखी हे बहीण भावाच्या प्रेमाचे, विश्वासाचे आणि कर्तव्याचे प्रतीक आहे. ज्या रीतीने भाऊ आपल्या बहिणीला रक्षण करण्याचा विश्वास देतो, त्याचरीतीने पोलीस बांधव नेहमीच प्रत्येक स्त्रीयांचे पाठीराखे बनून भावासारखे रक्षण करतात त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने मिरजेतील कन्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थिनींनी मिरज शहर पोलीस ठाणे येथे जाऊन पोलीस बांधवांना राख्या बांधत रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक (वाहतूक शाखा) भगवान पालवे यांच्यासहित तेथील पोलीस बांधवांना स्वयंसेविकांनी राख्या बांधल्या. विद्यार्थींनींनी राख्या बांधल्याने सर्व अधिकारी व कर्मचारी भारावले होते.
प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. माधुरी देशमुख यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास माळकर यांच्याहस्ते पोलीस बांधवांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी स्त्रीयांच्या रक्षणासाठी पोलीस हे सदैव कर्तव्यदक्ष असून अडचणीच्या प्रसंगी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन केले. तसेच समाजाच्या रक्षणाची जबाबदारी पेलताना कुटुंबासोबत सणवार साजरे करणे शक्य होत नाही परंतु विद्यार्थीनींनी येथे रक्षाबंधन साजरा करून ही उणीव भरून काढली त्याबद्दल त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत ऋण व्यक्त केले.
या उपक्रमात सुमारे 50 विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागातील डॉ. माधुरी देशमुख, डॉ. मंजिरी कुलकर्णी, प्रा. विनायक वनमोरे, डॉ. गंगाधर चव्हाण, डॉ. बाबासाहेब सरगर, प्रा. रमेश कट्टीमणी, डॉ. सुनीता नाईक, प्रा. विश्वनाथ व्हनमोरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रमेश कट्टीमणी यांनी केले. आभार डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.