राजर्षी शाहू विद्यालयात देशाचे माजी कृषीमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांची जयंती उत्साहाने साजरी
प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड दि.28 : शहरातील राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर काॅलेज, कस्तुरबा गांधी विद्यालय, राजर्षी शाहू बालक मंदिर येथे देशाचे पहिले कृषिमंत्री डॉक्टर श्री पंजाबराव देशमुख उर्फ भाऊसाहेब यांचा जन्मदिन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
स्व.भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेस विद्यालयाचे प्राचार्य श्री बी एम हंगरगे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
तसेच यावेळी उपस्थित असलेले कर्मचारी उपप्राचार्य डॉ.पांडूरंग यमलवाड, पर्यवेक्षक श्री पंजाबराव सावंत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .
या कार्यक्रमास श्री एन.पी. केंद्रे,श्री ए.डी.मोरे, श्री शिवानंद टापरे ,डॉक्टर माणिक गाडेकर , श्री सुर्यकांतराव टापरे,श्री अशोकराव गळेगावे, श्री बालासाहेब माने,रत्नाकर कोत्तापल्ले, राजेश मोरे,राजेश कदम, तसेच वरिष्ठ क्लार्क श्री वैजनाथ आर्दड, श्री आर.आर.महालिंगे,श्री वाघमारे, श्रीमती एल.एम.जाधव, श्रीमती एम.एच.घोडेकर,यांच्यासह सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.