प्रतिष्ठा न्यूज

जयंत पाटील यांच्यावरील ईडीच्या कारवाईच्या निषेधार्थ आमदार सुमनताई पाटील यांचे कवठेमहांकाळ तहसीलदारांना निवेदन

प्रतिष्ठा न्यूज
कवठेमहांकाळ प्रतिनिधी : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर भाजपच्या आदेशाने ईडीने केलेली कारवाई अत्यंत चुकीची आहे. हि कारावाई तात्काळ मागे घ्यावे असे निवेदन तासगाव कवठेमहांकाळ च्या आमदार सुमनताई पाटील यांनी कवठेमहांकाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार बी.जे.गोरे यांना दिले .
निवेदनात म्हटले आहे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर भाजप कडून जाणूनबुजून खोट्या केसेस दबाव टाकून दाखल केल्या जात आहेत.इडीच्या माध्यमातून चुकीची कारवाई केली जात आहे. या चुकीच्या कारवाईचा कवठेमहांकाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र जाहीर निषेध करीत तहसीलदार बी.जे,गोरे यांना निवेदन दिले . तसेच त्यांच्यावरील केलेली कारावाई त्वरीत मागे घ्यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अगामी काळात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही निवेदानाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी बाजार समितीचे संचालक महेश पवार , ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कोळी , माजी सभापती दादासाहेब कोळेकर , ताजुद्दीन तांबोळी ,जिल्हा बँकेचे माजी संचालक चंद्रकांत हाक्के , महादेव माळी , शहाजी दोडमीशे , विलास कोळेकर , विजय पाटील उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.