प्रतिष्ठा न्यूज

लोहा येथे- तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ संपन्न

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा येथे तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा- आशाताई श्यामसुंदर पाटील शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ लोहा येथे करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.जिल्हा परिषद सदस्य- चंद्रसेन पाटील हे होते तर प्रमुख म्हणून खरेदी विक्री संघाचे सभापती- स्वप्नील पाटील उमरेकर, उपसभापती- श्यामअण्णा पवार, संदीप पाटील उमरेकर यांची उपस्थिती होती.
यावेळी खरेदी विक्री संघाच्या वतीने आशाताई शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना आशाताई शिंदे म्हणाल्या की,आ. श्यामसुंदर पाटील शिंदे यांच्या अथक प्रयत्नाने लोहा / कंधार मतदार संघामध्ये हरभरा खरेदी केंद्र चालू करण्यात आले.याचा फायदा शेतकऱ्याच्या माल हमी भावात खरेदी करून घेऊन देण्यात येणार आहे.
या शुभारंभ प्रसंगी सिद्धू पाटील वडजे, संघाचे सदस्य सुधाकर सातपुते, दिगंबर सोनवणे, शरद जोशी, भीमराव पाटील, ज्ञानोबा पाटील पवार, गोविंदराव पाटील चिंचोलीकर, सुधाकर पाटील शिंदे, अनिकेत जोमेगावकर, प्रसाद जाधव, सचिन कुदळकर, संतोष मुकणर, चेतन पवार, प्रशांत मोरे, शुभम कदम, अशोक सोनकांबळे, केशव इंगळे, भाऊराव खंदारे, सचिन कल्याणकर, मारुती कोचर, अंकुश देवकते, बाळासाहेब धुळगुंडे सह अनेक कार्यकर्ते, शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.