प्रतिष्ठा न्यूज

तासगाव ग्रामीण रुग्णालयाचा कारभार रामभरोसे

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव: तासगाव ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा वैद्यकीय अधीक्षक पूर्ण वेळ नसल्यामुळे सध्या कोलमडली असल्याचे दिसून येत आहे.अपुर्‍या स्टाप मुळे रुग्णांचे हाल होत आहेत.तसेच याठिकाणी अनेक औषधांचा तुठवडा निर्माण झाला आहे.त्यामुळे रुग्णांना बाहेरुन औषधे खरेदी करावी लागत आहेत.या रुग्णालयाचा कारभार रामभरोसे असतानाच येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.बिभीषण सारंगकर यांचे दवाखान्यात लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.रुग्णालयातील समस्या सोडवण्याऐवजी डॉ.सारंगकर दररोज दुपारनंतर ‘दांडी’ मारत असल्याचे दिसून येत आहे.ग्रामीण रुग्णालयाकडे गोरगरीबांचा दवाखाना म्हणून बघितले जाते.तालुक्यातील गोरगरीब रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येत असतात.अवघ्या तीन वैद्यकीय अधिकार्‍यांवर इथला कारभार सुरू आहे.या रुग्णालयातील अनेक पदेही रिक्त आहेत.त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत आहे.रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा सलाईनवर असताना वैद्यकीय अधीक्षक डॉ.बिभीषण सारंगकर हे मात्र निर्धास्त असल्याचे दिसून येत आहे.‘आवो – जावो घर तुम्हारा’ असा त्यांचा कारभार सुरू आहे.कधीही यायचे,कधीही जायचे, असा त्यांचा नित्यक्रम सुरू आहे. त्यांना जाब विचारणारे कोणी नसल्याने त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे.त्यांची पोस्ट श्रेणी 1 ची असल्याने इतर कर्मचारीही निमुटपणे काम करीत आहेत.त्यांना कोणीही काहीही विचारत नाही.मात्र अलिकडच्या काही दिवसांत कोणीही विचारत नसल्याने डॉ. सारंगकर यांनी त्याचा गैरङ्गायदा घ्यायला सुरूवात केली आहे.वास्तविक वैद्यकीय अधीक्षक या नात्याने त्यांनी पूर्णवेळ दवाखान्यात थांबणे गरजेचे आहे. शिवाय शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांनी नोकरीच्या ठिकाणी राहणे गरजेचे आहेत.मात्र शासनाचे नियम ङ्गाट्यावर मारत सारंगकर यांनी आपण कोणालाही जुमानत नसल्याचे दाखवून देण्यास सुरुवात केली आहे.
डॉ. सारंगकर हे तासगावात नोकरीच्या ठिकाणी न राहता सांगलीत राहतात. सकाळी 10 वाजता रुग्णालयात येतात.अवघे 4 तास दवाखान्यात काम करतात. त्यानंतर दुपारी 2 वाजता ते गायब होतात. दुपारी दोनला गेल्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी 10 वाजताच ते रुग्णालयात येतात.स्वत: सगळे नियम फाट्यावर बसवून इतर कमचार्‍यांनी मात्र नियमानेच वागले पाहिजे,असा त्यांचा पवित्रा असतो. यातूनच कर्मचारी व डॉ.सारंगकर यांच्यात वारंवार खटके उडत असल्याचे बोलले जात आहें.काम करताना सारंगकर हे दवाखान्यातील कोणत्याही अडीअडचणींकडे लक्ष देत नाहीत,दवाखान्यात औषधांचा नेहमीच तुठवडा असतो.ही औषधे उपलब्ध करण्याच्या दृष्ठीने आवश्यक प्रयत्न त्यांच्याकडून होत नाहीत. औषधांच्या तुठवड्यामुळे रुग्णांचे मात्र हाल होत आहेत.
डॉ.सारंगकर यांच्या मनमानी कारभाराला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय साळुंखे यांनी लगाम घालावा,अशी मागणी होत आहे, अन्यथा ‘ग्रामीण’चे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.