प्रतिष्ठा न्यूज

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड : राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी “राजर्षी शाहु महाराजांचा सामाजिक समता दृष्टीकोण” निबंध व “सामाजिक समता आणि वैज्ञानिक प्रगती” या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन शुक्रवार २३ जून २०२३ रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे ओळखपत्र घेऊन जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालय सिडको नवीन नांदेड येथे स्वखर्चाने उपस्थित रहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नांदेड यांनी केले आहे.
      ही निबंध,वक्तृत्व स्पर्धा   राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत
शुक्रवार २३ जून रोजी सकाळी ११ जवाहरलाल नेहरु वा. कार्य महाविद्यालय सिडको नवीन नांदेड येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. निबंध स्पर्धेचा विषय “राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक समता दृष्टीकोण” असून या स्पर्धेतून प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषीक व प्रमाणपत्र देण्यात येईल. ज्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी २३ जून रोजी सकाळी ११ वा. जवाहरलाल नेहरु समाज कार्य महाविद्यालय सिडको नवीन नांदेड येथे उपस्थित रहावे. असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.