प्रतिष्ठा न्यूज

लोहा तालुक्यातील 20 तलाठी सज्जा कार्यालय स्वतःच्या इमारतीत होणार-

प्रतिष्ठा न्युज /वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील महसूल विभाग व गावातील नागरिक यांच्या मधील योग्य समन्वय साधण्यासाठी असणाऱ्या तलाठी सज्जा कार्यालय इमारती स्वतःच्या होण्यासाठी तालुक्यातील 20 तलाठी सज्जाना हक्काची इमारत लवकरच मिळणार आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य लोकांची कामे ही तलाठी कार्यालयांशी संबंधित असतात. परंतु तालुक्यात अनेक गावांमध्ये तलाठी कार्यालये आजही भाड्याच्या जागेत आहेत. अनेक वेळा कार्यालयांची जागा बदलली जाते.त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते ही गैरसोय थांबविण्यासाठी महसूल विभागांतर्गत येणारे तलाठी यांचे सज्जा कार्यालय गावातच स्वतःच्या इमारतीमध्ये एका ठिकाणी स्थायिक स्वरूपात असावे यासाठी लोहा-कंधारचे आमदार श्यामसुंदर पाटील शिंदे यांच्या चांगल्या कल्पकतेने व प्रयत्नातून तसेच उपविभागीय अधिकारी मा.शरद मंडलिक व तहसीलदार मा. व्यंकटेश मुंडे यांनी पाठपुरावा केल्याने तालुक्यातील 39 तलाठी कार्यालयांपैकी 20 कार्यालयांसाठी 5 कोटी 13 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती मिळाली आहे.यात प्रत्येक सज्जा साठी 27 लाख 50 हजार निधी मिळणार आहे.
तलाठी यांनी गावातच राहून नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कार्यालय इमारती मध्ये बेडरूम व किचन रूम अशा सुविधा असणार आहेत. यामुळे मात्र तलाठी वेळेवर भेटतील आणि लोकांचा वेळ व पैसा वाचेल यात शंका नाही.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.