प्रतिष्ठा न्यूज

सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि. 10 (प्रतिनिधी) : सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त नितिन कापडणीस यांनी दिली.
दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वा. स्टेशन चौक, सांगली येथे मॅरेथॉन स्पर्धा व सकाळी 11 वा. पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृह सांगली येथे उत्कृष्ठ काम करणारे सफाई कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. दिनांक 14 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वा जिल्हा क्रिडा संकुल सांगली-मिरज रोड येथे तिरंगा चषक स्केटींग स्पर्धा, सकाळी 11 वा. पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृह सांगली येथे कोवीड 19 साथील मध्ये उत्कृष्ट कामे केलेल्या माजी सैनिकांचे सत्कार, स्वातंत्र्य सैनिकांचे सत्कार, 75 विधवा महिलांना तिरंगा ध्वज प्रदान करणे, सायं 4 वा श्री. कृष्णा नदी माई घाट सांगली येथे घरोघरी तिरंगा बोट रॅली, सायंकाळी 6 वा. छ. शिवाजी महाराज स्टेडियम, सांगली येथे तिरंगा चषक कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा छ. शिवाजी महाराज स्टेडियम, सांगली येथे घरोघरी तिरंगा अंतर्गत शालेय विद्यार्थी मार्फत प्रतिकृती साकारणे, सकाळी 11.30 वा छ. शिवाजी महाराज स्टेडियम, सांगली येथे घरोघरी तिरंगा अंतर्गत एरोमॅडेलिंग शोचे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.