प्रतिष्ठा न्यूज

सुंदरनगरमधील वारांगनानी तयार केल्या जवानांसाठी तिरंगा राख्या

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगलीच्या सुंदरनगर वेश्या वस्तीतील वारांगना महिलांनी आज भारतीय सीमेवर कर्तव्य बजावत असणाऱ्या आपल्या सैनिक भावासाठी तिरंगा राख्या तयार केल्या आहेत. या तयार केलेल्या तिरंगा राख्या सीमेवर पाठवल्या जाणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण आणि जमीर कुरणे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.
10 ऑगस्ट रोजी सर्वत्र रक्षाबंधन साजरे होत आहे. मात्र देशाच्या सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना आपले कर्तव्य सोडून रक्षाबंधन साजरे करता येत नाही. त्यामुळे सांगलीतील सुंदरनगर वेश्या वस्तीतील महिलांनी आपल्या सैनिक भावांसाठी राख्या तयार करत त्या सीमेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. वारांगना महिलांनी राख्या तयार करून त्या एका कार्डशीट पेपरवर चिकटवून त्यावर मेरे प्यारे भैया असा मजकूर लिहीत आपल्या सैनिक बांधवांबदल आपले बंधूप्रेम व्यक्त केले. यावेळी भारत माता की जय आशा घोषणा देत सैनिक बांधवांचे मनोबल वाढवण्यासाठी आम्ही भगिनी आपल्या सोबत आहोत असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. साधारण 500 राख्या या वारांगना महिलांनी आपल्या सैनिक बांधवांना पाठवण्याचा निर्धार केला आहे. सांगलीच्या सुंदरनगर वेश्यावस्तीत महिलांनी एकत्र येऊन तिरंगा राख्या तयार केलयक आहेत. सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण आणि जमीर कुरणे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये सुंदरनगर महिला विकास संस्थेच्या सैफिन शेख, जानका चनाळ, सुमन वाघमारे, राधा हातलगे, मलवा हिरामनी, गोदा भुसानी यांच्यासह महिलांनी सहभाग घेतला होता.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.