प्रतिष्ठा न्यूज

नांदेड शिवजन्मोत्सव अध्यक्षपदी- सुभाष पाटील स्वागताध्यक्षपदी- परमेश्वर पाटील तर प्रसिद्धी प्रमुखपदी- बालाजी सिरसाट यांची निवड

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी छञपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव नांदेड शहरात मोठ्या हर्षोउल्हासात साजरा होणार आहे. त्यासाठी एका समितीची निवड करण्यात आली असून समितीच्या अध्यक्षपदी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष- सुभाष पाटील कोल्हे, स्वागताध्यक्षपदी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष- परमेश्वर पाटील तर प्रसिद्धी प्रमुखपदी- बालाजी सिरसाट यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
मराठा सेवा संघ सार्वजनिक शिवजन्मोत्सव कार्यकारिणी निवडी संदर्भात अत्यंत महत्वाची बैठक यशवंतराव चव्हाण मराठा विद्यार्थी वस्तीग्रह नांदेड येथे संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी- सदस्य इंजि.शे.रा. पाटील उपस्थित होते. मराठा सेवा संघ कृषी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष- सोपानराव क्षीरसागर, मराठा सेवा संघाचे मधुकरराव देशमुख, मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक- शिवाजीराव खुडे, इंजि.व्हि.टी.शिंदे, शिक्षक परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष- शिवाजी पाटील बामणीकर, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष- नानाराव कल्याणकर, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष- उद्धव सुर्यवंशी, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा- अरुणाताई जाधव आदींची उपस्थिती  होती. नांदेड जिल्ह्यात छञपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव गेल्या पंचवीस- तीस वर्षापासून वैचारिकरित्या साजरी करणारी मराठा सेवा संघ ही एकमेव संघटना आहे. या उत्सवात महिलांचा युवकांचा मोठा सहभाग असतो. शिवजन्मोत्सव दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वैचारिक मेजवानी सह हर्षोउल्हासात साजरा करूयात तसेच जन्मोत्सवासाठीचा निधी मराठा सेवा संघाच्या खात्यावरच गतवर्षी प्रमाणे जमा करुन पारदर्शकता आणुयात असे मत बैठकीचे अध्यक्ष मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य इंजि शे रा पाटील  यांनी मांडले. मराठा सेवा संघ व ३३ कक्ष आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती अध्यक्षपदी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष- सुभाष कोल्हे यांची स्वागताध्यक्षपदी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष- परमेश्वर पाटील तर प्रसिद्धी प्रमुखपदी- बालाजी सिरसाट यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी मराठा सेवा संघाचे पंडित कदम, संभाजी ब्रिगेड विभागीय कार्याध्यक्षपदी- श्रीनिवास शेजुळे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष- भगवान कदम, रमेश पवार, राधाकृष्ण होगे, वनिता देवसरकर, बळिराम फाजगे, प्रल्हाद दुरपडे, शिवाजी आलेगावकर, पी.जी.कऱ्हाळे, संजय हंबर्डे, कमलेश कदम, माधव कांजाळकर, चंद्रशेखर कदम, स्वप्नील शिंदे, संतोष धामदरीकर, अंकुश कोल्हे, परमानंद खिल्लारे, मारोती मेंडेवाड, कपील वाडीकर, चंद्रकांत पावडे, यादव राजेगोरे, यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.