प्रतिष्ठा न्यूज

‘परशुराम’ च्या माजी विद्यार्थ्यांनी जपली शाळेबद्दल कृतज्ञता

प्रतिष्ठा न्यूज/तुकाराम पडवळ
गगनबावडा : परशुराम विद्यालयाचे माजी विद्यार्थी नेहमीच आपल्या शाळेबद्दल विविध प्रकारची मदत देऊन आपल्याला शाळेबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त करत असतात.माझी शाळा सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत त्यांनी ही मदत दिली. हे अभियान १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येत आहे.
आज परशुराम विद्यालयातील दहावी च्या २०१२-१३ च्या बॅच  मधील विद्यार्थ्यांनी  शाळेस आज दहा कुंड्या रोपांसह दिल्या. तसेच शाळा रंगरंगोटी सुशोभीकरण साठी रोख ७२००रुपये जमा जमा करून ती रक्कम मुख्याध्यापक रंगराव गोसावी यांच्याकडे सुपूर्द केली .यावेळी विद्यालयाचे प्राचार्य गोसावी यांनी विद्यार्थ्यांना धन्यवाद देऊन विद्यार्थ्यांनी आजच्या विद्यार्थ्यां समोर एक आदर्श निर्माण केला अशी भावना व्यक्त केली.
यावेळी या बॅचचे प्रतिनिधी  हर्षद सुर्यवंशी, ओमकार पांगळे,आकाश सावंत ,  सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील, गिरीश प्रभूलकर,जावेद अत्तार यांचेसह शिक्षक वर्ग  हे ही उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.