प्रतिष्ठा न्यूज

राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर काॅलेज मध्ये विद्यार्थ्यांनी घेतला आनंद नगरीचा आनंद

 प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार 
नांदेड : शहरातील वसंतनगर भागातील राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर काॅलेज मध्ये विद्यार्थ्यांनी आनंद नगरीचे आयोजन करण्यात येऊन खरी कमाई चा आनंद घेतला. कार्यक्रमाचे सुरुवातीला मु.अ.हंगरगे यांच्या हस्ते बहुजन प्रतिपालक छ.राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
    विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणे
कष्ट करून कमाई करण्याची आवड निर्माण व्हावी, यासाठी शालेय पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच उपक्रमाचा भाग म्हणून शहरातील राजर्षी शाहू विद्यालय,नांदेड येथे  आनंद नगरीच्या माध्यमातून खरी कमाई कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नुकतेच येथील राजर्षी शाहू विद्यालय
 शाळेत आनंदनगरी, खरी कमाई कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या खरी कमाईमध्ये शाळेतील 5 वी ते 9  वी  वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सकाळ आणि दुपार सत्रात आनंद नगरी चा कार्यक्रम उत्साने साजरा करण्यात आला.  या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. विद्यार्थ्यी स्वावलंबी व्हावे,रोजगार करण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून आयोजन करण्यात आले होते.   विद्यार्थ्यांमध्ये भावी जीवनात व्यवसाय कशा रीतीने केला जातो. खरेदी- विक्री काय असते ? याचा बाल वयापासूनच अनुभव येण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थ शाळेत आणून त्यांचा स्टॉल लावला होता. काही मुलांनी चिवडा, खरमुरे, खिचडी, शेंगदाणा चिक्की, मिरची भजे, इडली वडा, मोड आलेले धान्य, शेंगदाणा लाडू, चॉकलेट, बिस्किट, चिप्स, समोसा, पाणी- पुरी असे विविध खाद्यपदार्थ स्टॉलमध्ये लावण्यात आले होते. यावेळी हजारो रूपयाची उलाढाल झाली होती. शाळेच्या परिसरातील नागरिक व पालकांनी तसेच
शाळेतील विद्यार्थ्यांनी या स्टॉलला भेट देऊन त्यांचे विविध खाद्यपदार्थ विकत घेऊन त्यांना खरी कमाई करण्यासाठी प्रोत्साहन दिले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री बालाजी हंगरगे यांच्या हस्ते फीत कापून खरी कमाई,आनंद नगरीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उप मुख्याध्यापक डॉ.पांडूरंग यमलवाड,पर्यवेक्षक पंजाबराव सावंत,प्रा.डॉ.तुकाराम जाधव, श्री बालाजी कदम सर. श्री टी.एन.रामनबैनवाड , श्री वसंत भोसले, श्री शिवानंद टापरे,श्री आर.एच.कदम, श्री आनंद मोरे, श्री अमोल भंगाळे,श्री एन.पी.केंद्रे, श्री आर.आर.महालिंगे,श्री धनाजी बस्वदे, तसेच श्रीमती जायेभाये मॅडम, श्रीमती पावसे मॅडम, श्रीमती खुळे मॅडम, श्रीमती लोलम मॅडम,श्रीमती बायस मॅडम, श्रीमती देगलूरकर मॅडम, श्रीमती घोडेकर, आदी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, नागरिक उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.