प्रतिष्ठा न्यूज

वायफळेतील दिनकरआबा पाटील पतसंस्थेस शाखा विस्तारास परवानगी खानापूर,करगणी,ढालगाव येथे नव्याने होणार शाखा.सुखदेव पाटील यांच्या प्रयत्नास यश

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव तालुक्यातील वायफळे येथील दिनकर आबा पाटील नागरी सहकारी पतसंस्थेस शाखा विस्तारास परवानगी देण्यात आली आहे.अप्पर निबंधक (पतसंस्था) सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य,पुणे श्रीकृष्ण वाडेकर यांनी ही परवानगी दिली आहे. खानापूर, करगणी व ढालगाव येथे आता या संस्थेच्या नव्याने शाखा होणार आहेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेव पाटील यांच्या प्रयत्नास यानिमित्ताने यश आलेले दिसून येत आहे.तासगाव तालुक्यातील वायफळेसारख्या ग्रामीण भागात सुखदेव पाटील यांनी दिनकरआबा पाटील नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली.सुरुवातीला एका गाळ्यात सुरू असणाऱ्या या  पतसंस्थेचे कामकाज आज तीन मजली इमारतीत काम सुरू आहे. एकीकडे सहकाराला घरघर लागली आहे. जिल्ह्यातील सहकारी संस्था मोडकळीस येत आहेत.अशा परिस्थितीत स्वतः एम. कॉम असणाऱ्या सुखदेव पाटील यांनी दिनकर आबा पाटील पतसंस्थेची यशस्वी घोडदौड सुरू ठेवली आहे.
कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या या संस्थेच्या सध्या वायफळे, सावळज व तासगाव या ठिकाणी शाखा सुरू आहेत. तिन्ही ठिकाणी सुरुवातीपासून ‘अ’ हा ऑडिट वर्ग संस्थेने टिकवून ठेवला आहे. गरजूंना अर्थसहाय्य करून या संस्थेने अनेकांचे संसार उभारले आहेत.या संस्थेच्या कामकाजावर सुखदेव पाटील यांचे बारीक लक्ष असते.सभासद, कर्जदार यांना केंद्रबिंदू म्हणून संस्थेने काम सुरू ठेवले आहे.जिल्हाभरातील हजारो ठेवीदारांनी संस्थेवर विश्वास ठेवून संस्थेत कोट्यवधी रुपयांची ठेव ठेवली आहे.या संस्थेच्या शाखा विस्तारास परवानगी मिळावी, अशी मागणी सुखदेव पाटील यांनी अप्पर निबंधक, पुणे यांच्याकडे केली होती. या मागणीनुसार संस्थेच्या खानापूर, करगणी व ढालगाव या ठिकाणी शाखा विस्तारास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या संस्थेच्या आता तब्बल सहा शाखा होणार आहेत. यापैकी वायफळे, सावळज व तासगाव या ठिकाणच्या शाखा पूर्वीच सुरू झाल्या आहेत.
सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात या संस्थेने आपला नावलौकिक मिळवला आहे. अनेक संस्था डबघाईला येत असताना या संस्थेने मात्र ठिकठिकाणी शाखा विस्ताराचा झपाटा लावला आहे. नियोजनबद्ध कामकाजामुळे हे सर्व शक्य होत आहे. सुखदेव पाटील व त्यांच्या संस्थेतील सहकारी कर्मचाऱ्यांच्या कष्टामुळे संस्थेची घोडदौड सुरू आहे. आगामी काळात जिल्हाभरात या संस्थेच्या शाखा सुरू करणार आहोत, असा मनोदय सुखदेव पाटील यांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.