प्रतिष्ठा न्यूज

जोमेगाव येथे “श्री राजे संभाजी दूध डेअरी फॉर्म हाऊस” चा थाटात शुभारंभ संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
उमरा : शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वी पासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई, गावठी दुधाळ गाई, व दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा
व्यवसाय केला तर निश्चितपणे हा शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. पण चांगला दर मिळाळा पाहीजे यासाठी शासकीय स्तरावर आधारभूत किंमत देणारा कायदा होणे गरजेचे आहे. दुग्धव्यवसाय हा शेतीचा जोडधंदा म्हणून केला जातो तसेच दुग्ध व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेतील कणा आहे. ग्रामीण भागात उत्पादित केलेले दूध शहरी ग्राहकांना रास्त दराने पुरविण्यात येते. हेच उद्धिष्ट समोर ठेऊन शेतीशी निगडीत असलेला जोडधंदा म्हणून लोहा तालुक्यातील जोमेगाव येथील तरुण मेहनती शेतकरी रामेश्वर शिंदे यांनी “श्री राजे संभाजी (कंट्री) दूध डेअरी फार्म हाऊस’ या नावाने डेअरीचा शुभारंभ करून दूध व्यवसायाला सुरुवात केली आहे.
या शुभारंभ प्रसंगी गावातील केशव पाटील, सुधाकर पाटील, संजय पाटील, मोहन शिंदे, संजीव शिंदे, दशरथ पाटील, बाबाराव शिंदे, मारोती शिंदे, राम शिंदे, रामेश्वर शिंदे, शंकर शिंदे, विठ्ठल शिंदे, किरण शिंदे, व गावातील अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.