प्रतिष्ठा न्यूज

हातनी येथे महावितरण कंपनीच्या 33 के व्ही उपकेंद्राचे-आ.श्यामसुंदर पाटील शिंदे यांचे हस्ते भूमिपूजन संपन्न

प्रतिष्ठा न्युज /वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील हातनी येथे महावितरण कंपनीचे 33/11 के व्ही उपकेंद्र कामाचे भूमिपूजन आमदार श्यामसुंदर पाटील शिंदे व शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा- आशाताई शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी गावकऱ्यांच्या वतीने आ.श्यामसुंदर पाटील शिंदे व आशाताई शिंदे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रसंगी बोलताना आ.श्यामसुंदर शिंदे म्हणाले आपल्या कंधार-लोहा मतदार संघात शिक्षण, आरोग्य, सिंचन व रस्ते या साठी माझा नेहमी प्रयत्न राहीला असून इथुन पुढे ही उर्वरित कामे मी करणार आहे. या 33 के व्ही उपकेंद्रा मुळे विजेचा तुटवडा कमी होणार आहे. त्यामुळे मी नेहमी महावितरण च्या संपर्कात होतो असेही आ.शिंदे यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांताशी संवाद साधताना आशाताई शिंदे यांनी मतदार संघातील विकास कामांचा लेखाजोखा स्पष्ट केला
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी- नामदेवराव कदम, हे होते, प्रमुख पाहुणे म्हणून- स्वप्नील पाटील उमरेकर, श्यामअण्णा पवार, आर.पी.चव्हाण, सचिन दवंडे, बालाजी वैजाळे, भास्करराव पाटील जोमेगावकर, बालाजी इसादकर, गुरुप्रसाद देसाई, यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी राजू पाटील कापसीकर, गोविंदराव पाटील चिंचोलीकर, संजय पाटील ढेपे, विजय जाधव, ओमराजे शिंदे, रणजीत हंबर्डे, बालाजी जाधव, आदिनाथ शिंदे, गणेश हंबर्डे, नामदेव कदम, दिगंबर कदम, सुरेश ढगे, प्रदीप पाटील, पंडित मेथे, गोपीराज हंबर्डे, पिंपळदरी सरपंच संतोष पाटील जाधव, सुनील भदरगे, शिवाजी आळने, रामराव पाटील मारताळा, अविनाश उमरेकर, पंजाब माळेगावे, संभाजी वने, व्‍यंकटी आढाव, अंकुश ढाकनीकर, कचरू बंडेवाड, प्रशांत मोरे, रामेश्वर नरनाळे, रामेश्वर लोहकरे, सचिन लोहकरे सह कार्यकर्ते, गावकरी व महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.