प्रतिष्ठा न्यूज

काँग्रेस कमिटीत संविधान दिन साजरा; २६/११ हल्ल्यातील शहिदांना अभिवादन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. २६ : जिल्हा काँग्रेस कमिटीत आज भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.
मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीरपुत्रांच्या व नागरिकांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक पठणही झाले.

२६/११ च्या भ्याड हल्ल्यात भारतमातेच्या अनेक शूरांनी आपल्या प्राणांची आहुती देत नागरिकांचे रक्षण केले. या रक्तपातात अनेक सर्वसामान्य नागरिकही बळी पडले.

यावेळी कॉंग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, बाळासाहेब पाटील, सचिन चव्हाण, पैगंबर शेख, अरूण पळसुळे, सुरेश पट्टनशेट्टी, बाबगोंडा पाटील, कोळी मामा, सुरेश गायकवाड आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.