प्रतिष्ठा न्यूज

जि. प. प्रा. शा. परमोरी येथे संविधान दिन उत्साहात साजरा

प्रतिष्ठा न्यूज / जावेद पिंजारी
वणी : जि. प. प्रा. शाळा परमोरी येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष गणेश गांगोडे,कैलास गांगोडे व सर्व शिक्षक वृंद यांनी केले.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान उद्देशिका सामूहिकरित्या म्हटले.
शाळा स्तरावर संविधान उद्देशिका लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
लेखन झाल्यावर विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले. डॉ राजेंद्र प्रसाद व घटना समिती, मसुदा समिती, संविधानाचे महत्व व निर्मिती याविषयी नौशाद यांनी माहिती दिली.
शेवटी रौदळ यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी सुनिता विसपुते,बेबी आहिरे, मंदा शिंदे उपस्थित होत्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.