प्रतिष्ठा न्यूज

नागाव कवठेच्या पाटील कुटुंबियांनी जपली सामाजिक बांधिलकी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : नागाव कवठे येथील महादेव पाटील यांच्या परिवाराच्या वतीने आईच्या तृतीय पुण्यस्मरणा निमित्त जिल्हा‎ परिषद शाळा नागांव कवठे येथील सर्व विद्यार्थ्यांना बूट व सॉक्स वाटप करूण‎ आगळीवेगळी श्रद्धांजली नागांव कवठेचे माजी सरपंच व शाळा व्यवस्थापन समिति चे अध्यक्ष महादेव पाटील व त्यांचे मोठे बंधु दादासो पाटील यांनी वाहिली. आपल्या आईच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्त त्यांची आठवण म्हणुन त्यांच्या‎ पुण्यतिथी निमित्त ज्या शाळेत‎ प्राथमिक शिक्षण घेतलं त्याच‎ शाळेत विध्यार्थ्यांना बूट व सॉक्स वाटप करण्याचा मनोदय होता. शनिवार दि.24 जून 2023 रोजी सर्व कुटुंबासहीत शाळेत येऊन सर्व विद्यार्थ्यांना सुमारे चाळीस हजार रुपये खर्च करून सर्व विदयार्थ्यांना बूट व सॉक्स वाटप करण्यात आले.सर्व मुलांना मोफत वाटप करत आगळीवेगळी‎ श्रद्धांजली अर्पण केली.गावातील ग्रामस्थांनी या वेगळ्या परंपरेला चांगला प्रतिसाद दिला असून अशा प्रकारच्या वेगवेगळे उपक्रम ग्रामस्थांनी राबवावेत असे मत शाळेतील शिक्षकानी गावातील नागरिकासमोर उपस्थित केले.यावेळी विकास सोसायटीचे चेअरमन श्री. अतुल झांबरे,उपसरपंच श्री.सुधीर पाटील,गावचे पोलीस पाटील श्री. मल्हारी पाटील,माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गुणवंत पाटील,माणिक पाटील माजी चेअरमन बाळासाहेब पाटील,संजय पाटील,संतोष पाटील,रंगराव पाटील,सयाजी पाटील,प्रकाश पाटील, शाहूल पाटील,सचिन पाटील गावातील आजी माजी सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.रुक्मिणी वाघमोडे व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सर्व शिक्षकवृंद व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. ‎

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.