प्रतिष्ठा न्यूज

विलिंग्डन महाविद्यालयातील अमृता पाटील हिची पश्चिम विभागीय अंतर विद्यापीठ महिला क्रिकेट स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघामध्ये निवड

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : शिवाजी विद्यापीठ येथे झालेल्या अंतर विभागीय महिला क्रिकेट स्पर्धेमधून विलिंग्डन महाविद्यालयातील खेळाडू अमृता सुभाष पाटील (एम ए भाग २) हिची कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्री टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी भुवनेश्वर ओडिशा येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय अंतर विद्यापीठ महिला क्रिकेट स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघामध्ये निवड झाली. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.व्ही. ताम्हणकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी जिमखाना समिती अध्यक्ष डॉ.राजू कांगणे, डॉ.आर.एस.पोंदे उपस्थित होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटी सांगली विभागीय अध्यक्ष डॉक्टर विश्राम लोमटे सदस्य रामकृष्ण पटवर्धन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.आर.ए. कुलकर्णी उपप्राचार्य डॉ.सुरेश कुंभार उपप्राचार्य डाॅ. एस. जी. कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. तर महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गणेश सिंहासने, योगिता परमने , अशोक आंबोळे यांचे मार्गदर्शन लाभले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.