प्रतिष्ठा न्यूज

भारतीय संस्कृतीचे महात्म्य युवा पिढीला कळणे गरजेचे : अभय भंडारे

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : विलिंग्डन महाविद्यालय सांगली येथे संस्थापक प्राचार्य गो. ची. भाटे यांच्या स्मृती व्याख्यानांतर्गत प्रसिद्ध वक्ते व सामाजिक कार्यकर्ते अभय भंडारी यांचे भारतीय संस्कृती व पर्यावरण या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी भंडारी यांनी भारतीय संस्कृतीचे महत्त्व आजच्या तरुण पिढीला समजावून सांगितले, कशाप्रकारे भारतीय संस्कृतीमध्ये पर्यावरणाला महत्त्व दिल्या गेले, याबद्दल त्यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉ. ताम्हणकर यांनीही आपल्या अध्यक्षीय मनोगतातून भारतीय संस्कृतीचे प्रतिक वसुधैव कुटुम्बकम याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ एस आर कुंभार, उपप्राचार्य डॉ. एस जी कुलकर्णी उपस्थित होते.  डॉ. एन. टी पडाल  यांनी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम बघितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हे डॉ. आर पी कांगणे यांनी केले. या कार्यक्रमातील भारतीय संस्कृती विषयीची महती ऐकण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, निमंत्रित आणि विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.