प्रतिष्ठा न्यूज

वागळुद येथे लखमापूर केंद्राची शिक्षण परिषद संपन्न

प्रतिष्ठा न्यूज / जावेद पिंजारी
कसबे वणी, ता. दिंडोरी दि. 28 : लखमापूर केंद्राची फेब्रुवारी महिन्याची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागळूद येथे ऑफलाईन संपन्न झाली.
ही शिक्षण परिषद लखमापूर केंद्राचे केंद्रप्रमुख संजय जगताप यांच्या नियंत्रणाखाली संपन्न झाली.
जिल्हा परिषद वागळूद ची शाळा म्हणजे एक सुंदर, नयनरम्य व निसर्ग रम्य परिसर असलेली शाळा होय.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागळूद चे विनायक जोपळे व रामदास जोपळे सरांनी शिक्षण परिषदेचे आयोजन केले होते. अतिशय सूत्रबद्ध व नियोजनपूर्वक शिक्षण परिषदेचे सुंदर असे आयोजन जोपळे बंधू यांनी केले होते.
विद्येची आराध्य देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केंद्रप्रमुख संजय जगताप तसेच नौशाद, टिपरे, जोपळे, व सर्व मुख्याध्यापकांनी केले.
लखमापूर केंद्राचे केंद्रप्रमुख संजय जगताप यांनी फेब्रुवारी महिन्याच्या शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक करून कोण कोणते विषय हाताळले जाणार आहेत याची पूर्वकल्पना दिली.
शिक्षण परिषदेची सुरुवात ओपनिंग ऍक्टिव्हिटीने झाली. ओळखा पाहू मी कोण? हि ऍक्टिव्हिटी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हेळुसके च्या मुख्याध्यापिका योगिता मोरे यांनी घेतली. त्यानंतर सात अंकाची ऍक्टिव्हिटी देखील अतिशय छान पद्धतीने घेतली.
त्यानंतर परमोरीचे उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षक व सीआरजी सदस्य नौशाद यांनी मागील शिक्षण परिषदेचा मागोवा व आढावा घेतला.
त्यानंतर नौशाद यांनी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आधारित लिसनिंग स्किल आणि स्पिकिंग स्किल यावर अतिशय समर्पक व परिपूर्ण मार्गदर्शन केले व डायटचे अधिव्याख्याता मा. कैलास सदगीर यांचा लिसनिंग ऍक्टिव्हिटी व स्पीकिंग स्किल यावर आधारित व्हिडिओ दाखवण्यात आला.
आपत्ती व्यवस्थापन ही तासिका देखील नौशाद यांनी घेतली या तासिकेत मागील शिक्षण परिषदेत झालेल्या आपत्ती व्यवस्थापन या विषयाची उजळणी घेतली. व त्यातील पुढचा भाग आग व भूकंप याविषयी सखोल माहिती दिली. सेव चिल्ड्रन या संस्थेने तयार केलेला भूकंप आपत्ती व्यवस्थापन यावर आधारित व्हिडिओ दाखवण्यात आला.
व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दोराच्या गाठी व आपत्तीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने मदत करावी, हा व्हिडिओ दाखवून त्यावर चर्चा करण्यात आली. ढिगार्‍याखाली दबलेल्या भूकंपग्रस्त व्यक्तीला कशा पद्धतीने बाहेर काढावे याचे प्रात्यक्षिक देखील करून दाखवण्यात आले.
यानंतर सामाजिक भावनात्मक शिक्षण नाती कौशल्य या विषयाची तासिका दहेगावचे उपक्रमशील तंत्रस्नेही शिक्षक रामेश्वर टिपरे यांनी घेतली. यात नाती कौशल्य कशा पद्धतीने टिकवावे स्व- व्यवस्थापन कसे करावे याविषयी त्यांनी माहिती सांगितली. यावेळी नाती कौशल्यावर आधारित व्हिडिओ दाखवण्यात आला.
त्यानंतर प्रशासकीय बाबींवर केंद्रप्रमुख संजय जगताप यांनी माहिती दिली.
शेवटी योगिता मोरे म्हेळुसके यांनी सर्वांचे आभार मानले.
संपूर्ण शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन नौशाद यांनी केले.
यावेळी शिक्षण परिषदेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लखमापूर, करंजवण, खेडले, म्हेळुसके, आवनखेड, परमोरी, दहेगाव, वागळुद या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.