प्रतिष्ठा न्यूज

ईलेक्ट्रो होमिओपॅथी चिकित्सक यांचा महाराष्ट्रात स्वतंत्र बोर्ड स्थापन होणार : डॉ सदाशिव धाबे

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड :  मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च चे संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर यांची ईलेक्ट्रो होमिओपॅथी स्पाजरिक चिकित्सक वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ.सदाशिव धाबे, उपाध्यक्ष डॉ. गिरीश माने, लातूर जिल्हा प्रमुख डॉ. बालाजी पांचाळ, मुंबई विभाग सदस्य- डॉ. राजेंद्र डिगे व पदाधिकारी यांनी सेंट जॉर्ज रुग्णालय परिसर फोर्ट मुंबई येथे भेट घेऊन दि.28 नोव्हेंबर 2023 रोजी निवेदन सादर करण्यात आले आहे .
ईलेक्ट्रो होमिओपॅथी चिकित्सक समस्या निवारण समितीचे अध्यक्ष- डॉ. श्रीराम सावरिकर कमिटीचा अहवाल शासनाकडे दि. 29 मे 2023 रोजी वर्ग करण्यात आला आहे. माननीय डॉ.व्हि.एम.कटोच आय डी सी चेअरमन, कमिटी जो पर्यंत मान्यता देत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात ईलेक्ट्रो होमिओपॅथी साठी स्वतंत्र बोर्ड स्थापन करण्यात यावा. अशी सूचना सावरिकर कमिटी ने महाराष्ट्र राज्य शासनास ईलेक्ट्रो होमिओपॅथी चिकित्सा सेवा समस्या निवारण, सुसूत्रीकरण व सबलीकरण समिती अहवाल याद्वारे केली आहे. अशी माहिती  मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर यांना डॉ.धाबे यांनी दिली आहे. डॉ.श्रीराम सावरिकर कमिटीचा त्यावर सकारात्मक अहवाल शासनाकडे वर्ग झाला असून त्याला तात्काळ मान्यता देण्यात यावी अशी विनंती डॉ.सदाशिव धाबे यांनी केली. त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च चे संचालक- डॉ.दिलीप म्हैसेकर यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. लवकरच महाराष्ट्र राज्यातील सर्व ईलेक्ट्रो होमिओपॅथी चिकित्सक यांच्या साठी बोर्ड स्थापना होईल असे संकेत आहेत. ई.स्पा.चि.वे आ.म. राज्याचे उपाध्यक्ष- डॉ. गिरीश माने, लातुर जिल्हा प्रमुख- डॉ.बालाजी पांचाळ, डॉ. राजेंद्र डिगे आदींसह अनेक जण उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.