प्रतिष्ठा न्यूज

जनतेला दारिद्र्य रेषेतून बाहेर कढणाऱ्या मोदींना साथ द्या – आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचे आवाहन; सांगलीत नमो संवाद

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत सबका साथ सबका विकास हे धोरण राबवत शेकडो जनकल्याणकारी योजना राबून जनतेला दारिद्र्य रेषेतून बाहेर काढले. आणि अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणल. अशा ध्येयवादी मोदींचे प्रतिनिधी संजयकाका पाटील यांना आपण निवडून द्यावे, असे आवाहन सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले.

सांगली लोकसभेतील महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ नमो संवाद कॉर्नर सभा प्रभाग क्रमांक 1 व 8 मध्ये पार पडली. यावेळी ते बोलत होते.
या सभेत बोलताना आमदार सुधीर दादा गाडगीळ म्हणाले, या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून साठ वर्षे सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसने देशाची प्रगती, देशाचा विकास, याबाबत कोणतेच ठोस धोरण न राबवता या देशाला धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली निव्वळ मताचे राजकारण करून अमर्याद राजसत्ता भोगली. या देशाला आतंकवाद्यांच्या दडपणाखाली, फुटीरवाद्यांच्या दडपणाखाली, भ्रष्टाचाराच्या, अत्याचाराच्या, गुंडगिरीच्या दडपणाखाली ठेवून देशाला सतत आर्थिक दिवाळखोरीत ठेवले होते. मात्र 2014 ला सत्तेत आलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षाच्या कालावधीत सबका साथ सबका विकास हे धोरण राबवत शेकडो जनकल्याणकारी योजना राबून 25 कोटी जनतेला दारिद्र रेषेतून बाहेर काढले. देशाची सर्वांगीण प्रगती करत. भारताची विस्कटलेली अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणून जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारा देश म्हणून जगामध्ये मान्यता मिळवली.
या लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा देशात मोदीजींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार आणण्यासाठी सांगली लोकसभेतून संजय काका पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहन केले.
याप्रसंगी माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, राम मंदीराचे स्वप्न पूर्ण करून हिंदूंचा स्वाभिमान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जपला आहे. तसेच देशाचा विकास अत्यंत गतीने केला आहे. असाच गतीमान विकास करण्यासाठी खासदार संजयकाका पाटील यांना निवडून द्या.
यावेळी अल्पसंख्यांक सरचिटणीस मुन्नाभाई कुरणे, भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्षअविनाश मोहिते, मंडल अध्यक्ष रवींद्र सदामते, सुजित काटे, ऋषिकेश सूर्यवंशी, रवींद्र ढगे, कोमल चव्हाण, शोभा बिकट, अर्जुन मजले, अशोक पवार, अभिजीत मिराजदार, दरिबा बंडगर, सुभाष गडदे, समाधान लोंढे, राजू जाधव तसेच प्रभाग 8 मधील माजी नगरसेविका सोनाली सागरे सविताताई मदने, कल्पना कोळेकर, महेश सागरे, प्रियानंद कांबळे, काजल कांबळे, सुनील भोसले, सदाशिव पाटील, प्रसाद वळकुंडे, छायाताई सरवदे, संतोष सरवदे, दीपक पाटील आदी भाजप पदाधिकारी तसेच या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.