प्रतिष्ठा न्यूज

संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली मिसळ पे चर्चा ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : सांगली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सांगली दौऱ्याप्रसंगी मिरजेत माजी नगरसेवक पांडुरंग कोरे यांच्या निवासस्थानी ‘मिसळ पे चर्चा’ कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधला. परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी खासदार संजयकाका पाटील, भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष प्रकाश ढंग, जनसुराज्य पार्टीचे समित कदम, सुशांत खाडे, पांडुरंग कोरे, गजानन कल्लोळी यांच्या सह भारतीय जनता पार्टी तसेच महायुतीच्या घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
चंद्रकांतदादा पाटील यांनी मोदी सरकारच का हवे? याविषयी अनेक बाबी मांडल्या. दैनंदिन जीवनातील अगदी छोटी-छोटी उदाहरणे देत त्यांनी मोदी सरकारचे महत्त्व जनतेला पटवून दिले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.