प्रतिष्ठा न्यूज

तासगावच्या चंपाबेन शाळेचे घवघवीत यश…आंतरशालेय टिळक वक्तृत्व स्पर्धेत तब्बल ७ बक्षिसांसह सलग तिसऱ्या वर्षी जनरल चॅम्पियनशिप..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे सांगली कॅम्पस दै.केसरी कार्यालय सांगली येथे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या आंतर शालेय टिळक वक्तृत्व स्पर्धेत चंपाबेनच्या विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले असून तब्बल सात बक्षिसं मिळवत सलग तिसऱ्या वर्षी जनरल चॅम्पियनशिप खेचून आणली.टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या सांगली कॅम्पसच्या वतीने गेल्या पंधरा वर्षांपासून सांगली व कोल्हापूर या विभागात वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातात.सदर वक्तृत्व स्पर्धेमध्ये इंग्रजी,मराठी व संस्कृत विभागात तीन गटात यावर्षी शाळेचे १८ विद्यार्थी सहभागी झाले होते.त्यापैकी तब्बल ७ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उज्ज्वल असे यश प्राप्त करत शाळेचा गौरव वाढवला.अलर्क नितीन जोशी (संस्कृत)आठवी ते दहावी मोठा गट उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक,सेजल महेश इनामदार (संस्कृत)आठवी ते दहावी मोठा गट द्वितीय क्रमांक,श्रिया संदीप पाटील (मराठी) नववी दहावी मोठा गट उत्तेजनार्थ प्रथम,वृंदा विशाल खेराडकर (मराठी) सातवी आठवी मध्यम गट तृतीय क्रमांक,सुकृत महेश इनामदार (मराठी) सातवी आठवी मध्यम गट प्रथम क्रमांक,स्वरा मिलिंद खंडागळे (इंग्रजी) पाचवी सहावी लहान गट उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक, परिमल संतोष टिळे (मराठी) पाचवी सहावी लहान गट द्वितीय क्रमांक,या घवघवीत यशा बद्दल शालासमिती अध्यक्ष श्री देवधर,मुख्याध्यापक मुकुंद जोग,पर्यवेक्षक प्रकाश ऐतवडेकर,बौद्धिक विभाग प्रमुख नितीन जोशी व सौ.नंदिनी गायकवाड, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.