प्रतिष्ठा न्यूज

महायुती सरकारकडून बांधकाम कामगारांना विविध योजनेचा लाभ : आमदार सुधीर दादा गाडगीळ

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दिनांक 14 ऑगस्ट:- अहिल्यानगर कुपवाड परिसरातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना भारतीय जनता पार्टी, सांगली शहर जिल्हा कामगार मोर्चाच्या माध्यमातून सांगली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार मा. सुधीर दादा गाडगीळ यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या संसार उपयोगी भांड्यांच्या साहित्याचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना आम.सुधीर दादा गाडगीळ म्हणाले, महाराष्ट्रातील 25 लाख नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र शासनाकडून जीवन उपयोगी संसाराच्या साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. केंद्रातील मा नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार, महाराष्ट्रातील मा एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजनेच्या माध्यमातून कार्यरत आहे.
या असंघटित क्षेत्रातील कामगारांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने, कामगारांच्या कुटुंबीयांना,मुलांना विविध योजनेच्या माध्यमातून सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून हे सरकार काम करत आहे. लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांना आर्थिक दृष्टीने सक्षम करण्यास महायुती सरकार वचनबद्ध आहे.
यावेळी बोलताना भाजपा कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अविनाश मोहिते म्हणाले, सांगली जिल्ह्यामध्ये जवळपास 90 हजार बांधकाम कामगार नोंदणीकृत आहेत.या सर्व कामगारांना या संसार उपयोगी भांड्यांच्या संचा पुरवठा केला जाईल.सर्व बांधकाम कामगारांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
या कार्यक्रमात पै सुभाष गडदे, जिल्हाध्यक्ष भाजपा सांगली शहर जिल्हा कामगार मोर्चा यांनी स्वागत व प्रस्तावना केली. या प्रसंगी भाजपा कामगार मोर्चाचे प्रादेशिक सचिव श्री उदय मुळे, भाजपा कामगार मोर्चा सरचिटणीस बंडू माने, कामगार मोर्चा उपाध्यक्ष समाधान लोंढे, कामगार मोर्चा मंडळ अध्यक्ष निवास लाटे, कामगार मोर्चा उपाध्यक्ष, प्रकाश आवटी, यांच्यासह लाभार्थी बांधकाम कामगार व नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.