प्रतिष्ठा न्यूज

८ जुलै व ९ जुलै रोजी होणार सांगली जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली :  सांगली जिल्हा बुद्धिबळ संघटना, आणि केपीज चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा ही नूतन बुद्धिबळ मंडळ, सांगली यांच्या विशेष सहकार्याने नूतन बुद्धिबळ मंडळ, बालाजी चौक, कापड पेठ, सांगली येथे होणार आहेत.
            ११ वर्षाखालील मुलांची स्पर्धा शनिवार, ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता तर खुली निवड स्पर्धा रविवार, ९ जुलै, रोजी , सकाळी १० वाजता होणार आहे. या स्पर्धेसाठी
पुढीलप्रमाणे रोख बक्षिसे असणार आहेत ११ वर्षाखालील
मुले प्रथम क्र. ₹ ५००/- ,  द्वितीय क्र. ₹ ३००/- ,तृतीय क्र. ₹ २००/-  मुलींनाही मुलांप्रमाणेच रोख बक्षिसे असणार आहेत.
त्याचप्रमाणे खुली निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी प्रथम क्र. ₹७५०,द्वितीय क्र. ₹ ५००/- ,तृतीय क्र.₹ ३००/-   चौथा क्र.₹  २५०/-,  पाचवा क्र.₹ २००/-,  तसेच उत्तेजणार्थ बक्षिसे सर्व गटासाठी २० पेक्षा जास्त ट्रॉफी आणि मेडल्स असणार आहेत.
           स्पर्धेसाठी ₹ २००/- प्रवेश फी आहे. ऑनलाईन भरण्यासाठी Gpay/ Phonepay 8390018308 हा नंबर देण्यात आला आहे. तसेच  या खेळाडूचे नाव, जन्म तारीख,
पैसे भरल्याचा तपशील व्हाट्सअँप करणेसाठी पुढील नंबर देण्यात आला आहे 8390018308.  या निवड झालेल्या सर्व खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेची प्रवेश फी जिल्हा बुद्धिबळ संघटनेकडून भरली जाणार आहे.
       जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा खेळणेसाठी  राज्य बुद्धिबळ संघटनेची नोंदणी करणे बंधनकारक आहे. यासाठी काही नियमावली पुढीलप्रमाणे असणार आहे.
1)- जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा ही स्विस लीग पद्धतीने होईल.
2)- पंचांचा निर्णय अंतिम राहील.
          अनुक्रमे शनिवारी होणाऱ्या ११ वर्षा खालील स्पर्धेतील सर्वोत्तम  २ मुले आणी २ मुली यांची तसेच
रविवारी होणाऱ्या खुल्या स्पर्धेतील ४ खेळाडूंची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड होणार आहे.
अधिक माहितीसाठी चंद्रकांत वळवडे(सचिव)सांगली जिल्हा बुद्धिबळ संघटना यांना संपर्क करण्यासाठी आव्हान करण्यात आले आहे. 9975959055, 8390018308. 7588842605
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.