प्रतिष्ठा न्यूज

प्रशांत केदार यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोशल मीडिया तासगाव तालुका अध्यक्षपदी निवड

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : बहुजन आंबेडकर चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत केदार यांची डॉ.रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या रिपब्लिकन सोशल मीडिया व आयटी सेलच्या सेलच्या तासगाव तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.गेली अनेक वर्षे शाहू -फुले -आंबेडकर चळवळीचे काम सामाजिक कार्यकर्ते प्रशांत केदार करीत आहेत.अनेक सामाजिक विषयावर लेखन,आंदोलने,प्रबोधन तसेच पत्रकारिता केदार यांनी केली आहे.त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.रामदास आठवले यांचे आदेशानुसार सोशल मीडिया सेल सांगली जिल्हाध्यक्ष विशाल काटे यांनी प्रशांत केदार यांची रिपब्लिकन सोशल मीडिया व आयटी सेलच्या तासगाव तालुका अध्यक्षपदी निवड केली आहे.सदर निवडी नंतर प्रतिक्रिया देताना प्रशांत केदार म्हणाले,डॉ.रामदासजी आठवले साहेब यांच्या रिपब्लिकन सोशल मीडिया व आयटी सेलची असणारी  कर्तव्य व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे.तसेच पक्षाच्या तालुक्यातील सर्व राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक घडामोडी समाजातील सर्व स्तरापर्यंत  पोचवून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.