प्रतिष्ठा न्यूज

करुळ घाटात दरड कोसळली; संरक्षक कठडाही तुटला; स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : गेले चार दिवस गगनबावडा  परिसरात व घाटमाथ्यावर अतिवृष्टी होत आहे. दोनच दिवसापूर्वी भुईबावडा घाटात संरक्षक भिंत कोसळली. तर आता  करूळ घाटातही मोठ्या प्रमाणात दरडीचा ढीग रस्त्यावर कोसळला आहे. डोंगराचा मोठा भाग रस्त्यावर आल्याने नव्याने बांधलेले संरक्षक कठडे तुटले आहेत. गेली सहा महिने  रुंदीकरणाच्या कारणास्तव  या मार्गावरील वाहतूक  बंद आहे.
तालुक्यात गेले चार दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीत करूळ घाटात रस्त्यात दरड कोसळली आहे. कोसळलेल्या दरडी संरक्षक कठड्यावर आदळल्याने कठड्याचा काही भाग दरीत कोसळला आहे. संबंधित यंत्रणेकडून दरडींचा ढीग हटवण्याचे काम सुरू आहे. मात्र संरक्षक कठडे तुटल्याने संबंधित ठेकेदाराच्या निकृष्ट कामांबाबत व यंत्रणेच्या दुर्लक्षाबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
करूळ घाट रस्ता रुंदीकरणामुळे गेले काही महिने बंद आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनाकडून करण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तीने ही घाट मार्गाला मोठा दणका दिला आहे. यापूर्वी संरक्षक भिंत दरीत कोसळली होती. दरम्यान ठेकेदाराच्या निकृष्ट कामांबाबत तसेच संबंधित यंत्रणेने कामाकडे केलेले दुर्लक्ष यावर टिकेची झोड उठवण्यात आली होती. पुन्हा एकदा दरड कोसळून संरक्षक कठडे तुटल्याने घाटमार्गाच्या निकृष्ट कामांबाबत चर्चा केली जात आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.