प्रतिष्ठा न्यूज

आमदार आसगावकर यांच्या फंडातून सांगलीत शांतीनिकेतनमध्ये प्रिंटर वितरण…

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि. १८ :आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार जयंत आसगावकर यांचे फंडातून सांगली जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात 388 शाळा व महाविद्यालयांना मल्टी फंक्शनल प्रिंटरचे वितरण सहकार तपस्वी माजी खासदार गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल मिरज येथे करण्यात आले होते .
दुसऱ्या टप्प्यामध्ये सांगली जिल्ह्यातील उर्वरित 252 शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना मल्टीफंक्शनल प्रिंटर वितरणाचा समारंभ गुरुवार दिनांक 18/7/2024 रोजी सकाळी 9.30 वा. शांतिनिकेतन लोकविद्यापीठ , लोकरंगभूमी हॉल, सांगली येथे आयोजित केला आहे . सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आमदार डॉ. विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील व अध्यक्ष म्हणून आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, गटनेते विधान परिषद उपस्थित राहणार आहेत. तसेच आमदार विक्रम सावंत, आ. अरुण लाड, आ. सुमनताई पाटील, आ मानसिंग नाईक, मा. पृथ्वीराज पाटील सांगली शहर जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी, मा. जयश्रीताई पाटील, मा. प्रतीक जयंत पाटील, मा.संजय विभुते मा.दिगंबर जाधव, मा. संजय बजाज, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षक विभाग कार्यकारी अध्यक्ष प्रा. एन.डी.बिरनाळे व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मल्टी फंक्शनल प्रिंटर वितरण समारंभ संपन्न होणार आहे तरी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन प्रा. अरविंद जैनापुरे जिल्हाध्यक्ष शिक्षक काँग्रेस सांगली यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.