प्रतिष्ठा न्यूज

तासगाव पोलीस ठाण्यासमोर टाळ मृदंगाच्या निनादात आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव तालुक्यातील मांजर्डे येथील शितल मोहिते हिच्या आत्महत्या प्रकरणी सर्व संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात होते. मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे यांनी शीतल हिच्या पतीला अटक करून इतरांना सोडून दिले. याप्रकरणी मोरे यांचे निलंबन व्हावे, या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून तासगाव पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन सुरू आहे.आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पोलीस ठाण्यासमोर टाळ – मृदंगाच्या निनादात ग्यानबा तुकाराम… चा गजर करीत अनोखे आंदोलन करण्यात आले.गेले तीन दिवस धरणे आंदोलन सुरू असतानाही पोलिसांनी झोपेचे सोंग घेतले आहे.त्यामुळे झोपलेल्या पोलिसांना जाग यावी,विठ्ठलाने त्यांना सुबुद्धी द्यावी,अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.