प्रतिष्ठा न्यूज

आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड विटा येथे जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : ७ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेचे उद्घाटन लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्डच्या क्रीडांगणावर  संस्थेचे अध्यक्ष अँड वैभव दादा पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. युवक सेना संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अँड वैभव दादा पाटील यांनी सर्व स्पर्धक व क्रीडा शिक्षक यांचे आपल्या विद्यालयात स्वागत करून स्पर्धा संपन्न होत असताना विद्यालयाकडून कोणतीही गैरसोय होणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ. स्पर्धा या उत्कृष्टरित्या पार पाडाव्यात आदर्श संकुलास यजमानपद दिल्याबद्दल सर्व आयोजकांचे आभार यापुढेही अशाच क्रीडा विद्यालय परिसरात घेण्यास आमची परवानगी आहे. असे मत व्यक्त केले. स्पर्धेचे नियम व अटी यांचे सखोल मार्गदर्शन क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा सांगली चे जमीर अत्तार यांनी मनोगतात स्पर्धकांना दिले या कार्यक्रमास अविनाश नाना चोथे नगरसेवक, संस्थेचे आर्थिक विकास व व्यवस्थापन संचालक  रविराज सूर्यवंशी, स्कूलचे प्रिन्सिपल  सुहास तळेकर,  जहांगीर तांबोळी हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र चे उपाध्यक्ष प्रा. प्रदीपकुमार चव्हाण, सांगली जिल्हा हँडबॉल असोसिएशन उपाध्यक्ष  नंदकुमार पाटील, राष्ट्रीय कबड्डी मार्गदर्शक  प्रवीण गावडे सांगली जिल्हा हँडबॉल सहसचिव प्रा.  उदय भोरे, सांगली जिल्हा हँडबॉल असोसिएशन चे सहसचिव तोफिक कोकणे पंच कमिटी चेअरमन ,यशवंत चव्हाण खानापूर तालुका क्रीडा समन्वयक वैभव सदामाते, शशिकांत साबळे ,संजय कुंभार ,संदीप सावंत, जितेंद्र पाटील यांच्यासह विविध शाळांचे विद्यार्थी व प्रशिक्षक उपस्थित होते या स्पर्धेचे नेटके आयोजन आदर्श स्टेट चे क्रीडाशिक्षक  संजय गायकवाड यांनी केले होते. या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक मिस रजनी तळेकर यांनी केले तर आभार राजेंद्र पाटील यांनी मानले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.