प्रतिष्ठा न्यूज

तासगावातील हजारो शिवभक्तांकडून 1 जुलैला श्री रायगडावर छत्रपतींची पूजा संपन्न अरुण साळुंखे मित्रपरिवाराकडून सर्व शिवभक्तांच्या भोजनाची व्यवस्था..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : पूज्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली गेली सदतीस वर्षांपासून दुर्गराज श्री रायगडच्या पूजेसाठी कोणताही ऋतू, ऊन, वारा, पाऊस काहीही असो नित्य नियमाने शिवभक्त छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पूजेसाठी जातात.हि पूजा आता रायगड व्रत बनली आहे.दरवर्षी प्रमाणे 1 जुलै या दिवशी समस्त तासगाव तालुक्याला मिळालेला यादिवशीचा छत्रपतींच्या पूजेच्या मानाचा पूजेचा सोहळा शिवप्रेमींनी हजारोंच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी श्री शिरकाईदेवी,महाराजांची मूर्ती,सिंहासन,जगदीश्वर आणि श्री शिवछत्रपतींची समाधी यांची पूजा करण्यात आली.शिवभक्तांनी आरती,ध्येयमंत्र,प्रेरणामंत्र म्हणून छत्रपतीना मुजरा केला.यावेळी आलेल्या हजारो शिवभक्तांच्या भोजनाची व्यवस्था सलग दुसऱ्या वर्षी खासदार संजय काका पाटील आणि युवानेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवानेते अरुण साळुंखे आणि मित्र परिवाराने केली होती.अरुण साळुंखे,विनायक पाटील,विनायक धोत्रे,चिकू नलवडे, पोपटराव देशमुख,धीरज साळुंखे, ओंकार भिसे,अभी माने,संदीप सूर्यवंशी,संतोष माने यांनी भोजनाचे व्यवस्थापन केले होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.