प्रतिष्ठा न्यूज

कवठेमंकाळ तालुक्यातील पहिली मुलगी देशसेवेत दाखल

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील करोली टी कवठेमंकाळ तालुका म्हणजे देश सेवेला अर्पण असणारा हा भाग.
या भागातील बरेच युवक हे देश सेवेत आहेत. करोली,(t) गावचे श्री.प्रकाश विठ्ठल पाटील सांगली येथील महाबळ ऑटो येथे इंजिनिअर म्हणून सध्या काम करतात ,त्यांना दोन मुलं मुलगा बीएससी नर्सिंग करून सिनर्जी हॉस्पिटल येथे रुग्णसेवक सेवेत दाखल झालेला आहे, तर दुसरी त्यांची कन्या निशा प्रकाश पाटील.
निशा पाटील यांचे शिक्षण जयसिंगपूर येथील झेले हायस्कूल या ठिकाणी तर जयसिंगपूर हायस्कूल व जुनिअर कॉलेज या ठिकाणी पुढील शिक्षण झाले.
निशा पहिल्यापासूनच उत्साही असल्याने खेळात व शिक्षणात दोन्हीतही तरबेज.
कॉलेज जीवनातत एनसीसी मध्ये प्रशिक्षण झाले. त्यानंतर एस वाय बी एस सी ला असताना देश सेवेत दाखल होण्याचे स्वप्न पाहू लागली.
आई वडील भाऊ आणि नातलग यांनी प्रोत्साहन दिले, त्यामुळे आज निशा पाटील भारतीय सेनादलात बीएसएफ मध्ये निवड झाल्या.
कवठेमंकाळ तालुक्यात साठी हे अतिशय गर्वाची बाब आहे कवठेमंकाळ तालुक्यातील पहिली महिला देश सेवेत दाखल झाली निशा आज सिलिगुडी या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहे.
निशा पाटील व त्यांच्या परिवाराने मुलीवरती दाखवलेला विश्वास हा अनेक मुलींना प्रेरणा देणारा ठरणार आहे .
मुली ह्या फक्त घर सांभाळण्यासाठी नाहीत तर देश सुद्धा आपल्या कर्तुत्वाने सांभाळू शकतात हाच संदेश यातून निशा पाटील व परिवाराने दिलेला आहे .
भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.