प्रतिष्ठा न्यूज

सेवानिवृत्त मुख्याध्यापक जिवनराव तेलंग यांचे हृदय विकाराने निधन

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट

उमरा प्रतिनिधी : लोहा तालुक्यातील उमरा येथील मुळ रहिवासी असलेले सेवानिवृत्त मुख्याध्यापक जिवनराव मारोतीराव तेलंग यांचे वयाच्या 66 व्या वर्षी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने आज दि.03 जानेवारी 2023 रोज मंगळवारी सकाळी दुःखद निधन झाले असून त्यांचेवर आजच दुपारी 5 वाजता सिडको,नांदेड. येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

अतिशय गरीब परिस्थितीतून शिक्षण घेतलेल्या कै.जीवनराव तेलंग यांनी श्री साईबाबा हायस्कूल मारतळा येथे शिक्षकाची नोकरी मिळविली त्यांनी आपल्या नोकरी काळात अनेक विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन उच्च पदावर पाहोचण्यासाठी प्रयत्न केले असल्यामुळे ते विध्यार्थी प्रिय म्हणून ओळखण्यात येऊ लागले नंतर ते मुख्याध्यापक म्हणून काम करू लागले. ते अतिशय शांत व मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून परिचित होते.

कै.जिवनराव तेलंग यांना नोकरी बरोबर शेतीची खुप आवड असल्यामुळे ते सुट्टीच्यादिवशी पूर्ण वेळ शेतात असायचे आज पण ते शेतातच असतांना त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला त्यातच त्यांचे निधन झाले.

त्यांचे पश्चात पत्नी, 1मुलगा, 2 मुली असा परिवार आहे. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय बळीराम पुर नांदेड, येथील शिक्षक माणिक तेलंग यांचे वडील होते. तर सुगाव संकुलाचे केंद्रप्रमुख बाबुराव कापसे यांचे मेहुणे होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळव्यक्त करण्यात येत आहे.

त्यांच्या अंत्यविधीसाठी उमरा-मारतळा व सिडको परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.

●प्रतिष्ठा न्युज कडुन भावपूर्ण श्रद्धांजली●💐

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.