प्रतिष्ठा न्यूज

सांगलीतील युवा तरुणांनी नववर्षाचे स्वागत केले समाजोपयोगी रक्तदान शिबीराने

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : किसान चौक येथील द कर्ली टेल्स या प्राणीमित्र संस्थेने नववर्षाचे स्वागत समाजोपयोगी रक्तदान या उपक्रमाने करत समाजाला एक संदेश दिला आहे. आज समाजामध्ये रक्ताचा खूप तुडवडा जाणवत आहे. यासाठी प्रशासन तसेच अनेक सामाजिक संस्था काम करत आहेत. तरीही रक्ताच्या कमतरतेचा विषय संपलेला नाही. यासाठी लोकांमध्ये रक्तदान याविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे.
      या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन द कर्ली टेल्स या संस्थेने नवीन वर्षाची सुरवात रक्तदान शिबिराने केली. यासाठी त्यांना रक्त पेडी श्री वसंतदादा पाटील ब्लड सेंटर आणि HRC, मिरज यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी रक्तदान आथर्व चव्हाण, आदित्य किनींगे, प्रज्ञा बेडगे, आथर्व वझे, सुभाष राठोड, रवी राठोड, दिनकर जंगम, युगा जोशी, आकाश शिंदे इत्यादी युवक युवतींनी केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष ऋषिकेश खोलकुंबे यांनी प्रत्येक ३ महिन्यानी   शिबिर घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी रक्तदात्यांनी खोलकुंबे यांना दर तीन महिन्यांनी शिबिरामध्ये रक्तदान करण्याचे वचन दिले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयस खेमलापूरे, पल्लवी भोकरे, प्राची व्यगणकर, डॉ. रोनक पाटील, रमेश घाटगे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.