प्रतिष्ठा न्यूज

सांगलीवाडीत आणि झुलेलाल चौकात विकसित संकल्प भारत यात्रेचे स्वागत : महापालिकेच्या विविध योजनांच्या स्टॉलला नागरिकांचा मोठा प्रतिसाद

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात 10 जानेवारी ते 19 जानेवारी 2024 या कालावधीत शासकिय योजनांची माहिती देणाऱ्या विकसित भारत संकल्प यात्रा रथाचे सांगलीवाडीत आणि झुलेलाल चौकात जोरदार स्वागत करण्यात आले. सांगली वाडीत माजी सभापती माजी नगरसेवक अजिंक्य पाटील यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प यात्रा रथाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर सर्वांनी विकसित संकल्प यात्रेच्या निमित्ताने शपथही घेण्यात आली. यावेळी श्री. दत्तात्रय हरी चव्हाण विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी लेझिमच्या तालावर या रथाचे स्वागत केले. यावेळी माजी आमदार दिनकर पाटील यांनीही महापालिकेकडून लावण्यात आलेल्या विविध शासकीय योजना स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली. यावेळी माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांच्याहस्ते आयुष्मान कार्ड लाभार्थीस आयुष्यमान कार्डचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास माजी नगरसेवक अजिंक्य पाटील, सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, सचिन सागावकर, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. वैभव पाटील, जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद, वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा पाटील, स्वच्छता निरीक्षक किशोर कांबळे यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि सांगलीवाडीतील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि शपथ वाचन दीपक चव्हाण यांनी केले.

शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रा रथाचे झुलेलाल चौकात स्वागत

दरम्यान, शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रा रथाचे झुलेलाल चौकात स्वागत करण्यात आले. यावेळी आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली याठिकाणी विविध शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल उभारण्यात आले होते.

प्रारंभी माजी नगरसेवक पैल. रणजित सावर्डेकर आणि माजी नगरसेविका पवित्रा केरीपाळे, मनपा उपायुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत संकल्प रथाचे स्वागत करण्यात आले. यावेळी सर्वांना शपथ देण्यात आली. यावेळी सहायक आयुक्त सचिन सागावकर, सहदेव कावडे, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. वैभव पाटील, जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद, शहर समन्वयक वर्षारानी चव्हाण, डॉ. विजय ऐनापुरे, नगर अभियंता भगवान पांडव, वैद्यकीय अधिकारी शामराव नगर आरोग्य केंद्र डॉ. शबाना लांडगे, डॉ. महादेव सरगर तसेच भाजपा पदाधिकारी श्रीकांत शिंदे, रेखा इंगळे, रोहिणी मंगल, विजय वादवणे , अरविंद कार्वेकर दीपक चव्हाण जेष्ठ पत्रकार यांच्यासह महापालिका अधिकारी कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते.

दरम्यान उद्या रविवारी सकाळी 9 वाजता स्टेशन चौक सांगली आणि दुपारी 3 वाजता डी मार्ट समोर विकसित भारत संकल्प यात्रा येणार असून याठिकाणी सुद्धा आधारकार्ड, आयुष्यमान कार्ड, प्रधानमंत्री आवास योजना, स्व निधी योजना याचे स्टॉल असणार आहेत तसेच याठिकाणी नागरिकांसाठी आरोग्य तपासणी सुद्धा असणार आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त सुनील पवार यांनी केले .

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.