प्रतिष्ठा न्यूज

निमणी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ…गावासाठी निधी कमी पडून देणार नाही खासदार संजयकाका पाटील

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : निमणी ग्रामपंचायतीने हाती घेतलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही खासदार संजय काका यांनी दिली,ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.निमणी येथे शासनाच्या २५/१५ योजनेतून ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण,१५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून बंदिस्त गटर, आर सी सी गटर,घनकचरा व्यवस्थापन इत्यादी कामांचा शुभारंभ करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.निमणी येथील जेष्ठ माता श्रीमती गंगुबाई जयवंतराव पाटील यांनी वयाची ९५ वर्ष पूर्ण केल्याबद्दल खासदार काकांच्या हस्ते त्यांचे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविक माजी उपसरपंच आर.डी.पाटील यांनी केले.निवृत्त शिक्षक सोमदे व जेष्ठ नागरिकांच्या हस्ते काकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी निमणी,नेहरुनगर,बेंद्री व नागांव या ४ गावच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावाबाबत चर्चा झाली.यावेळी सरपंच सौ.रेखा रविंद्र पाटील,उपसरपंच राजेंद्र घोडके, सर्व सदस्य,ग्रामसेवक किरण जाधव, श्री चमन ग्रेप ग्रोअर्सचे चेअरमन आर आर पाटील,एस ए पाटील,सी ए पाटील,विकास सोसायटीचे चेअरमन विलासराव पाटील,माजी चेअरमन शरद पाटील,वसंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विलास भगवान पाटील, सचिव शिवाजी राजमाने,प्रकाश पाणीपुरवठा संस्थेचे व्हाईस चेअरमन आण्णासाहेब चौगुले,माजी सरपंच विजय पाटील,नेहरूनगर चे माजी उपसरपंच राजगोंडा पाटील बाळासाहेब पाटील,निवृत्त उपअभियंता दिलीप पाटील,मंडल अधिकारी प्रमोद पाटील,तलाठी राजाराम कारंडे,कृषी सहाय्यक उत्तम खरमाटे,नेहरूनगर ग्रामपंचायत सदस्य अमित देवकुळे,एम आर पाटील,गजानन पाटील,भगवान शिंदे, दादासाहेब पाटील,ए जे सूर्यवंशी, पोपटआण्णा पाटील,विलास कदम, अनिल शेळके,रंगाआप्पा गायकवाड, युवराज पाटील,दिपक पाटील,मेजर दुधारकर,वसंत सावंत,निखिल गायकवाड,नवनाथ पाटील,स्वप्निल चौगुले,शिवाजी कदम,सुरेश पाटील, उदय पाटील,उत्तम सुतार,खंडू चौगुले, प्रशांत पाटील,सुधीर पाटील,संतोष आडके,विश्वास राजमाने,किरण आडके,संतोष पाटील,श्रीरंग देवकुळे, अनिल देवकुळे,सचिन पाटील,प्रवीण पाटील,गणेश पाटील,भोपाल सुखदेव, रामदास पवार,सुधीर राजमाने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.