प्रतिष्ठा न्यूज

सामर्थ्य आणि लवचिकता व तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी योगाभ्यास एक उत्तम साधन : स्वाती सुशांत खाडे

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे 
मिरज : प्राचीन योगविद्येचा समृद्ध वारसा भारताला मिळाला आहे. योगा हे जणू भारताला मिळालेले मोठे वरदान आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. भारताने जगाला योगाची ओळख करून दिली आणि जगभरात योगाचा प्रसार केला. योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख मिळाली आहे. जगभरातील लोकांना योगाचे महत्व पटवून देण्यासाठी आणि योगाप्रती लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी २१ जून हा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा केला जातो. २०१४ मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत योग दिनाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर, हा प्रस्ताव स्विकारण्यात आला आणि योग दिनासाठी २१ जून ही तारीख निवडण्यात आली, तेव्हापासून आजतागायत हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
           या दिवसाचे औचित्य साधत दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था संचलित मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल अँड. ज्युनियर कॉलेज मिरज व मातोश्री तानुबाई दगडू खाडे पब्लिक स्कूल (सेमी इंग्लिश) मालगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साही आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी योगाविषयी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे म्हणाल्या “सामर्थ्य आणि लवचिकता निर्माण करण्यासाठी व तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी योगाभ्यास एक उत्तम साधन आहे.” यावेळी योगशिक्षक डॉक्टर चेतन कलगुटगी यांनी आलेल्या सर्व अतिथी व विद्यार्थी यांच्याकडून योगाभ्यास करून घेतला व त्याची महती सांगितली.
         या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य डॉक्टर सुरेश भाऊ खाडे संचालिका सुमनताई खाडे सुशांत खाडे आदींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे, दोन्ही स्कूलच्या मुख्याध्यापिका संगीता पाटील, सुप्रिया पाटील समन्वयक ज्योत्स्ना माने आधी मान्यवर उपस्थित होते. तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.