प्रतिष्ठा न्यूज

तासगाव शहरातील बंद सीसीटीव्ही आणि नगर वाचनालय सुरु करा; खर्च केलेला लाखो रुपयांचा निधी वाया

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : शहरातील हेल्पीग हँडस फौंडेशन कडून तासगाव शहरातील बंद स्थितीत असलेले सी सी टीव्ही कॅमेरा” व सांगली नाका येथील “तासगाव नगर वाचनालय” सुरु करणे बाबत तासगाव नगरपालिका मुख्याधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले.त्यात त्यांनी म्हंटले आहे कि,तासगाव शहरातील सी सी टीव्ही कॅमेरे व नगर वाचनालय हे गेले काही महिन्यापासून बंद आहेत.सदर या गोष्टीसाठी जनतेच्या कर स्वरूपातील रक्कमा पालिका प्रशासनाकडे जमा होतात आणि त्यातून विकास कामे होतात.मग या गोष्टीसाठी जो लाखो रुपयेचा निधी खर्च केला आहे,तो असा वाया जात आहे ही तासगाव शहराच्या दृष्टीने अत्यंत शोकांतिकेची बाब आहे.तसेच शहराची वाढती लोकसंख्या पाहता पार्किंग/ वाहतूक आणि कायदा सुव्यवस्था यावर नियंत्रण ठेवणेसाठी सि सि टीव्ही कॅमरे सुस्थितीत असणे आवश्यक आहेत.सोबत सांगली नाका येथील बरेच वर्ष बंद असलेले वाचनालय हे जेष्ठ नागरिक,महिला,तसेच स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी यांना अत्यंत गरजेचे असून आपणाला कळकळीची नम्र विनंती आहे की आपल्या शहरातील सी सी टीव्ही कॅमेरे आणि सांगली नाका येथील वाचनालय तातडीने सुरु करणेत यावे.यावेळी निलेश दीक्षित,सुशिल थोरबोले, विशाल शिंदे,सुशांत पैलवान,पद्माक्ष जोशी,राजू मुल्ला,सुधीर रसाळ, प्रसाद पैलवान,अथर्व जोशी,प्रणव हिंगमिरे,श्रीकांत गायकवाड,शुभम भाट,पुष्कर कालगावकर,गणेश भंडारी,प्रकाश माळी,अनिरुद्ध सुतार, आदित्य माळी,असिफ तांबोळी हे उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.